आरोग्य विभागात नोकरभरती ; 25 हजार जणांची भरती करणार
Featured

आरोग्य विभागात नोकरभरती ; 25 हजार जणांची भरती करणार

Sarvmat Digital

मुंबई – करोनाच्या नावाखाली अवाजवी दर लावत रुग्णांकडून पैसे लुटणार्‍या खासगी हॉस्पिटल्सला सरकारने चांगलाच दणका दिला आहे. अशा गोष्टींना चाप लावण्यात येणार असून सर्व दर हे ठरवून दिले जातील. त्यापेक्षा जास्त दर आकारणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. आरोग्य विभागात 25 हजार भरती करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आरोग्य क्षेत्रातील एकही जागा आता रिक्त ठेवणार नाही. सर्व कर्मचारी वर्ग भरण्यासाठी तात्काळ संबंधित सचिवांना आदेश देण्यात आले आहेत. प्रमोशन देखील तात्काळ करण्यात येणार आहेत. यात येत्या काही महिन्यांमध्ये 25 हजार भरती करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभाग अशा सर्वांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

आरोग्यमंत्री म्हणाले, कोव्हिड-19 महामारीचा गैरफायदा कोणीच घेऊ नये. अशा गोष्टींना सरकार चाप लावणार आहे. यासाठी नियोजनही करण्यात आलं आहे. कुठल्या गोष्टींना किती शुल्क आकारावं हे निश्चित करण्यात आलं आहे. त्याच्या बाहेर आता खासगी हॉस्पिटल्सला जाता येणार नाही. नाहीतर आम्ही कारवाई करणार आहोत.

Deshdoot
www.deshdoot.com