वसुलीवाल्यांच्या रजा केल्या बंद…
Featured

वसुलीवाल्यांच्या रजा केल्या बंद…

Sarvmat Digital

सुटीच्या दिवशीही भरा थकबाकी

अहमदनगर (प्रतिनिधी) – आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना सुरू असल्याने टार्गेट कंप्लीट करण्यासाठी महापालिकेने वसुली विभागातील कर्मचार्‍यांच्या रजा बंद केल्या आहेत. उपायुक्तांनी तसे आदेश कालच (शुक्रवारी) काढले आहेत.

2019-20 हे आर्थिक वर्ष संपण्याला आता 20 दिवसच बाकी आहेत. त्यामुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी, मार्केट विभागाच्या गाळेभाडे वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. थकबाकी, कर भरणार्‍या नगरकरांची गैरसोय होऊ नये यासाठी शनिवार, रविवार आणि इतर शासकीय सुट्टीच्या दिवशीदेखील वसुली कार्यालय सुरू राहणार आहे.

दि. 31 मार्चलादेखील वसुली कार्यालय सुरू राहणार आहे. भरणा संकलित करण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, असा आदेश उपायुक्त (कर) यांनी दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com