रेशन दुकानदारांना पाठीशी कधीच घालणार नाही : आ. पवार
Featured

रेशन दुकानदारांना पाठीशी कधीच घालणार नाही : आ. पवार

Sarvmat Digital

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – मागील 15 दिवसांत तालुक्यात रेशन दुकानदारांनी गोरगरीब जनतेचे असलेले धान्य वाटप न करता काळ्या बाजारात विक्री करून पैसे कमावण्याचा धंदा केला. तीन दुकानावर कारवाई होऊनही दखल घेतली जात नाही. सोनेगाव येथून 24 टन तांदूळ गुजरात राज्यात विक्री जाण्यासाठी पकडला यामध्ये तालुक्यातील आणखी 7 ते 8 दुकानदार सहभागी असल्याचे समजले आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याबाबत तपासी अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. यामध्ये कोणाला पाठीशी घातले जाणार नाही, असे आ. रोहीत पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 225 व्या जयंतीनिमित आ. रोहित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असलेल्या चौंडी येथे जाऊन सकाळी दर्शन घेतले. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला यावेळी पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, आण्णा डांगे, अक्षय शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात, सुर्यकांत मोरे, पांडुरंग मेरगळ आदी उपस्थित होते. यानंतर तालुक्यात दौरा करून जामखेड येथील हायस्कूलमध्ये क्वारंटाइनमध्ये असलेल्या नागरिकांची भेट घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.

माजी मंत्री राम शिंदे व आपली काय चर्चा झाली यावर बोलताना आ. रोहीत दादा म्हणाले माजी मंत्री राम शिंदे यांचे चिरंजीव अजिंक्य शिंदे याच्याशी संवाद साधत शाळेबाबत विचारपुस केली. यावर मुलानी चांगले उत्तर दिले. कुकडीचे आवर्तन 6 जून रोजी सुटणार आहे. हा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे झाला आहे. निर्णय झाला असल्याने कोणी उपोषणाला बसू नये आ. राम शिंदे यांना उपोषणाला बसायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.

कोरोना बरोबर जामखेड तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थीती निर्माण झाली आहे. त्याबद्दल मोहरी तलावातून पाणी टँकरने आणण्यासाठी नियोजन केले असून अधिकारी समवेत पाहणी केली. जामखेड शहरात 15 ते 20 दिवसांनी पाणी येते शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही टँकर चालू केले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांनी 12 टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. तलावातील पूर्ण पाणी संपल्यावर नगरपरिषदेने प्रस्ताव सादर केला की लगेच उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांनी टँकरला मंजुरी देतील.

तालुका प्रशासनाने करोना महामारीच्याबाबत पदाधिकारी व आम्ही मिळून जामखेड पॅटर्न तयार केला. यामुळे करोना साखळी तुटली आहे. आता मुंबई, पुणे व इतर जिल्हा व तालुक्यातील येणार्‍या नागरीक तालुक्यात आले तर त्याची माहिती प्रशासनाला द्या व करोना मुक्त झालेल्या तालुक्यात करोनाचा संसर्ग थांबवा, असे आवाहन आ. रोहीत दादा पवार यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com