Thursday, April 25, 2024
Homeनगरराशीनमध्ये निगेटिव्ह आलेले दोघे पॉझिटिव्ह

राशीनमध्ये निगेटिव्ह आलेले दोघे पॉझिटिव्ह

कर्जत 8 ः एकाच कुटुंबात पाच बाधित

कर्जत (वार्ताहर) – कर्जत तालुक्यातील राशीन येथील सुरूवातीला निगेटिव्ह आलेले दोघे आता पॉझिटिव्ह आल्याने एकाच कुटुंबात करोना बाधित असलेल्यांची संख्या आता पाच झाली आहे. यामुळे कर्जत तालुक्यामध्ये बाधितांची संख्या आठवर जाऊन पोहोचली असून, प्रलंबित असलेल्या दहा अहवालांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कर्जत तालुक्यातील राशीन येथील एक व्यक्ती पुणे येथे पत्नीस भेटण्यास गेली होती. तेथून आल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने तपासणी केली असता, ती व्यक्ती करोना बाधित आढळली.

- Advertisement -

प्रशासनाने त्याच्या कुटुंबातील त्या व्यक्तीचे वडील, दोन मुली व एक मुलगा अशा चौघांना नगर येथे तपासणीसाठी पाठविले. यामध्ये दि. 30 मे रोजी वडील व एका मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दुसरी मुलगी व मुलगा यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयाने त्यांचा स्त्राव पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठविला असता रविवारी दि. 31 मे रोजी हे दोघेही बाधित असल्याचा अहवाल आला. यामुळे एकाच कुटुंबात आता पुणे येथून आलेली व्यक्ती, त्याचे वडील, दोन मुली व एक मुलगा असे पाच जण बाधित झाले आहेत.

एकाच कुटुंबातील पाच सदस्य बाधित झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या पाच व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा अहवाल प्रतीक्षेत आहे. याशिवाय इतर नागरिकांचीही तपासणी केली जात आहे. कर्जत तालुक्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या आठ झाली आहे. राशीनमध्ये करोना बाधित रुग्ण सात झाले आहेत. प्रशासन बाधितांची ही साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या