Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरचंद्रदर्शन घडल्यानंतरच रमजान ईद साजरी

चंद्रदर्शन घडल्यानंतरच रमजान ईद साजरी

धर्मगुरूंकडून अधिकृत घोषणा होणार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– रमजान पर्वचा शनिवार दि. 23 रोजी सायंकाळी 29 वा उपवास पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता असून चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही अधिकृतरित्या प्राप्त झाल्यास रविवार दि. 24 रोजी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्याची घोषणा धर्मगुरूंकडून केली जाईल.

- Advertisement -

चंद्रदर्शन झाल्यावरच ईद साजरी केली जाते. दि. 23 मे रोजी चंद्र पाहण्याचा प्रयत्न करावा. दि. 23 रोजी चंद्रदर्शन झाले तर दि. दि. 24 मे रोजी ईद साजरी होईल. अन्यथा दि. 24 मे पर्यंत 30 रोजे पूर्ण होतील. त्यामुळे दि. 25 रोजी ईद साजरी होईल.

महिनाभरापासून मुस्लिम बांधवांनी पारंपारिक धार्मिक पद्धतीने निर्जळी उपवास करत अल्लाहच्या उपासनेसाठी अधिकाधिक वेळ दिला. गरजू घटकांना धनिक समाजबांधवांकडून जकात वाटप केली गेली.

लॉकडाऊनमुळे घरातच पाच वेळेच्या नमाज पठणासह तरावीहच्या खास नमाजचे रात्री उशिरापर्यंत पठण तसेच कुराण पठणावर समाजबांधवांकडून भर दिला गेला. शनिवारी सायंकाळी नूतन चंद्रदर्शन उर्दू, मराठी दिनदर्शिकेत दाखविले आहे. चंद्रदर्शन घडल्यास त्याची ग्वाही देण्याचे आवाहन केले आहे. लॉकडाऊन 31 मेपर्यंत असल्याने घरातच ईद-उल-फित्र साजरी करावी लागणार आहे. यंदाची ईद विना नवीन कपड्यांशिवाय साजरी केली जाणार आहे.

सरकारचे आदेश असल्याने मशीद किंवा इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यास परवानगी नाही. आपापल्या घरात नमाज अदा करावे. ईदच्या दिवशी एकमेकांना हस्तांदोलन किंवा गळाभेट न करता ईदची शुभेच्छा द्यावी, असे आवाहन समाजातील अनेक मान्यवरांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या