राम गोपाल वर्मा यांच्या ‘करोना व्हायरस’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज !
Featured

राम गोपाल वर्मा यांच्या ‘करोना व्हायरस’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज !

Sarvmat Digital

मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘करोना व्हायरस’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. हा चित्रपट जगभरात थैमान घालणाऱ्या करोना या रोगांवर आधारित असल्याची माहिती त्यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

राम गोपाल वर्मा या चित्रपटाचे निर्माते असून अगस्त्य मंजू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट तेलगूमध्ये तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर चार मिनिटांपेक्षा मोठा आहे. यामध्ये अगस्त्य मंजू मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com