तीन दिवसांत रेल्वे स्थानकांवर तिकिट विक्री
Featured

तीन दिवसांत रेल्वे स्थानकांवर तिकिट विक्री

Sarvmat Digital

दिल्ली – रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी २०० विशेष नॉन एसी रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्या ट्रेनच्या तिकिटांचं आरक्षणही सुरू करण्यात आले होते. आता त्या पाठोपाठ आता कॉमन सर्व्हिस सेंटरवरही तिकीट विक्री सुरू करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने रेल्वे सेवादेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता हळहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर येताना दिसत आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्रीसह आता काही ठराविक रेल्वे स्थानकांवरदेखील जाऊन रेल्वेच्या तिकिटांचं आरक्षण करता येणार आहे. सध्या देशातील १.७ लाख कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्री सुरू करण्यात येणार आहे. तसंच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये प्रवाशांना ठराविक रेल्वे स्थानकांवरील तिकिट विक्री सुरू केली जाणार असून त्यासंदर्भात प्रोटोकॉल तयार केला जात असल्याचं गोयल म्हणाले.
ओडीसा आणि पश्चिम बंगालनं श्रमिक ट्रेनची मागणी केली होती. परंतु अम्फान या वादळामुळे त्या ठिकाणची रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित केली आहे. २३ मे नंतर या ठिकाणी पुन्हा रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल. काही राज्ये आताही आम्हाला सहकार्य करत नाहीयेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत केवळ ट्रेनच्या २७ फेऱ्या झाल्या,” असंही गोयल यांनी स्पष्ट केलं.

Deshdoot
www.deshdoot.com