राहुरीच्या स्विकृत नगरसेवकपदी अरूण तनपुरे, मुजफ्फर काद्री यांची निवड

राहुरीच्या स्विकृत नगरसेवकपदी अरूण तनपुरे, मुजफ्फर काद्री यांची निवड

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – राहुरी नगर परिषदेच्या बहूचर्चित स्वीकृत नगरसेवकपदी माजी नगराध्यक्ष व राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे व मुजफ्फर काद्री यांची निवड करण्यात आली.

स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी गुरूवारी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या पदासाठी दोन जागा असल्याने सत्ताधारी गटाकडून अरूण तनपुरे, मुजफ्फर काद्री, डॉ. प्रितम चुत्तर, वसीम सय्यद तर विरोधी परिवर्तन गटाकडून माजी नगरसेवक राजेंद्र उंडे यांनी अर्ज दाखल केले.

उंडे यांचा अर्ज तांत्रिक कारणातून नामंजूर करण्यात आला. उर्वरित चारपैकी दोन जणांची निवड होणार होती. पिठासीन अधिकारी प्रभारी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा राधा साळवे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. ज्येष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर डॉ. चुत्तर व सय्यद यांनी अर्ज माघारी घेततले. त्यानंतर पिठासीन अधिकार्‍यांनी तनपुरे व काद्री यांची निवड घोषित केली.

निवडीनंतर दोन्ही नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नगर विकास मंत्रालय आपल्या ताब्यात असल्याने नवीन विकास योजना राबविण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून स्वीकृत नगरसेवकपद स्वीकारले आहे. उंडे हे अनुभवी होते. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाल्याची खंत अरूण तनपुरे यांनी व्यक्त केली. शिवाजीराव सोनवणे यांनीही अनुभवी व्यक्ती नगरपरिषदेत आल्याने राहुरीच्या विकासाला हातभार लागेल, तनपुरे यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकासासाठी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून दोन्ही नगरसेवकांना परिवर्तन आघाडीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. सौ. उषाताई तनपुरे, ताराचंद तनपुरे, अरूण ठोकळे, बाळासाहेब उंडे, अनिल कासार, दीपक तनपुरे, विक्रम भुजाडी, नंदकुमार तनपुरे, शहाजी जाधव, ज्योती तनपुरे, अक्षय तनपुरे, संगीता आहेर, नंदा उंडे, अशोक आहेर, मुक्ता करपे, अर्चना पोपळघट, दशरथ पोपळघट, नमिता शेटे, राखी तनपुरे, संजय साळवे, सूर्यकांत भुजाडी, आदींसह नागरिक उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश भुजाडी यांनी आभार मानले.

Last updated

Deshdoot
www.deshdoot.com