Thursday, April 25, 2024
Homeनगरराहाता तालुक्यातील 35 हजार शेतकर्‍यांना खरीप पिक विम्याची प्रतिक्षा

राहाता तालुक्यातील 35 हजार शेतकर्‍यांना खरीप पिक विम्याची प्रतिक्षा

26 हजार 300 हेक्टरसाठी भरला 10 कोटी 56 लाखांचा हप्ता

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)- परतीच्या पावसाने सप्टेबर, आक्टोबर महिन्यात धुमशान केले. सोंगणीस आलेल्या खरिपाच्या पिकांचे प्रंचड नुकसान झाले. शासनाकडुन शेतकर्‍यांना थेट मदतही मिळाली. मात्र पिक विमा कंपनीकडून विम्याचे परतावे देण्याबाबत हालचाली होतांना दिसत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राहाता तालुक्यामध्ये जवळपास 35 हजार शेतकर्‍यांनी 26 हजार 300 हेक्टरवर खरीप पिकांसह फळबांगाचे विम्याचे हप्ते भरले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिदें यांनी दिली.

- Advertisement -

राहाता तालुक्यात साठ गांवामध्ये जवळपास 57 हजार हेक्टर वर शेती केली जाते. शेतकर्‍यांना अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस,पावसाचा खंड, वादळ वारा आदीमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना झालेल्या पिकाच्या नुकसानीचा मोबदला मिळावा त्यांचे सरंक्षण व्हावे यासाठी केंद्र सरकार डुन पंतप्रधान पिक विमा योजना सुरू करण्यात आली. शासनाकडुन सन 2019-20 या वर्षासाठी खरीप पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पिक विमा कंपनीमार्फत तर बहुवार्षिक फळपिकांसाठी बजाज अलायन्स जनरल इंशुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती.

खरीप पिक विम्यामध्ये राहाता तालुक्यातील 28 हजार 548 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता. खरीप सोयाबीनसाठी 24 हजार 117 शेतकर्‍यांनी 14 हजार 428 हे.क्षेत्राचा पिक विमा भरला होता. शेतकरी हिश्यापोटी विमा कंपनीला 1 कोटी 19 लाख 78 हजारा रूपयांचा विमा हप्ता प्राप्त झाला होता. मका पिकासाठी 2 हजार 438 शेतकर्‍यांनी 1 हजार 605 हेक्टरसाठी 8 लाख 82 हजारांचा विमा हप्ता भरला होता.

बाजरी पिका साठी 844 शेतकर्‍यांनी 591 हे. साठी 2 लाख 36 हजारांचा विमा हप्ता भरला होता तर कापसासाठी 876 शेतकर्‍यांनी 527 हे.साठी 10 लाख 21 हजारांचा पिकविमा हप्ता भरला होता.तसेच कांदा, भुईमुग, तुर ही सर्व पिके मिळून 28 हजार 548 शेतकर्‍यांनी आपल्या खरीपाच्या पिकांचे विमे राष्ट्रीय कृषी पिक विमा कंपनीमार्फत उतरविले होते. कंपनीला शेतकरी हिश्यापोटी 1 कोटी 42 लाखाच्यावर विमा हप्ता प्राप्त झालेला आहे. शेतकरी हिश्याबरोबर विमा कंपनीस राज्य सरकार व केंद्र सरकार कडुनही शासन हिस्सा प्राप्त झालेला आहे.

खरीप पिकांबरोबर तालुक्यातील 6 हजार 620 शेतकर्‍यांनी फळबांगाचे पिक विमे उतरविले आहेत. यामध्ये डाळींब पिकासाठी 5 हजार 322 शेतकर्‍यांनी 3 हजार 989 हेक्टरसाठी 2 कोटी 41 लाख 36 हजारांचा शेतकरी हीश्यापोटी विमा हप्ता भरला आहे. तर केंद्र व राज्याच्या हिश्यापोटी कंपनीला 4 कोटी 83 लाखांचा हप्ता मिळाला आहे. तसेच पेरू पिकांसाठी 1 हजार 200 शेतकर्‍यांनी 1 हजार 124 हेक्टरसाठी 30 लाख 85 हजारांचा हप्ता शेतकरी हीश्यापोटी भरला आहे. तर केंद्र व राज्य हिश्यापोटी कंपनीला 1 कोटी 55 लाखांचा शासन हिस्सा प्राप्त झाला आहे.

चिकु पिकासाठी 98 शेतकर्‍यांनी 88 हेक्टरसाठी 2 लाख 38 हजारांचा शेतकरी हिस्सा भरला आहे. तर केंद्र व राज्याच्या हिश्यापोटी विमा कंपनीला 2 लाख 38 हजारांचा शासन हिस्सा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे डाळींब, पेरू व चिकु पिकासाठी राहाता तालुक्यातुन बजाज अलायन्स जनरल इंशुरन्स कंपनीला 6 हजार 620 शेतकर्‍यांकङुन 5 हजार 201 हेक्टरसाठी शेतकरी हिस्सा व केंद्र राज्य सरकारच्या हिश्यापोटी 9 कोटी 14 लाखांचा विमा हप्ता प्राप्त झालेला आहे. त्यामुळे दान्ही पिक विमा कंपन्याना शेतकरी व शासन हिश्याचे विमा हप्त्यापोटी 10 कोटी 56 लाखांचा पिक विमा हप्ता प्राप्त झालेला आहे.

परतीच्या पावसाने चालुवर्षी मोठया प्रमाणात खरीपाच्या पिकांबरोबर फळबांगाचेही नुकसान झाले. शासनाच्या आदेशाने महसुल, कृषी तसेच संबधीत पिक विमा कंपन्याच्या प्रतिनिधीनी नुकसानीचे संयुक्त पंचनामे केले. शासनाने नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदतही केली आहे. मात्र शेतकरी तसेच शासनाकडुन मोठ्या प्रमाणात पिक विम्याचे हप्ते वसुल करूनही विमा कंपन्यांकडुन पिक विम्याचे परतावे देण्याबाबत हालचाली होतांना दिसत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना असुन पिक विमा कंपन्याकडुन विमा परतावे देण्याची मागणी पिंपरी निर्मळचे सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांचेसह शेतकर्‍यांनी केली आहे.

राहाता तालुक्यातिल जवळपास 35 हजार शेतकर्‍यांनी फळबागा व खरीप पिकांसाठी 26 हजार 300 हेक्टरचा पतप्रंधान पिकविमा योजनेतून पिक विमा भरला असुन शेतकरी हिस्सा तसेच केंद्र व राज्याचा हिस्सा मिळुन विमा कंपनीना जवळपास 10 कोटी 56 लाखांचा वर विमा हप्ता प्राप्त झालेला आहे.
-बापुसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी राहाता

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसुल कृषी व पिक विमा कंपनीच्या अधिकार्‍यांनी संयुक्त पंचनामे केले आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाकडुन खरीपासाठी हेक्टरी 8 हजार तर फळबांगासाठी हेक्टरी 18 हजारांच्या मदतीचे वाटप झाले आहे. मात्र या नुकसानीच्या पंचनामे करतांना विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. विमा कंपन्यांनी कोठ्यावधीचे विम्यांचे हप्ते वसुल करूनही अद्याप पिक विमा कंपन्याकडुन विम्याचे परतावे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचा विमा कंपन्यावरील विश्वास उडत चालला आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालुन विमा कंपन्यांना पिक विम्याचे परतावे देण्याचे आदेश द्यावेत.
-डॉ. मधुकर निर्मळ, सरपंच पिंपरी निर्मळ.

- Advertisment -

ताज्या बातम्या