Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे – अफवेमुळे पाससाठी परप्रांतीयांच्या रांगा

पुणे – अफवेमुळे पाससाठी परप्रांतीयांच्या रांगा

पुणे (प्रतिनिधी) – मूळ गावी जाण्यासाठी पास मिळणार असल्याच्या अफवेनं पुण्यात परप्रांतीयांच्या रांगा लागल्या होत्या. खडकमाळ तहसील कार्यालयासमोर गावी जाणार्‍यांची गर्दी झाली होती. दुपारी भर उन्हात नागरिकांच्या तहसील कार्यालयासमोर दुपारी रांगा लागल्या होत्या. मोठ्या संख्येने जमा झालेल्या नागरिकांत सोशल डिस्टन्स मेंटेन करण्याचं मोठं आवाहन होत. अखेर पोलिसांनी ही गर्दी हटवली.
गडबड गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. क्षेत्रीय कार्यालयातून या नागरिकांना तहसील कार्यालयात पास मिळणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळं अनेक परप्रांतीयांनी गर्दी केली होती. मात्र खडकमाळ तहसील कार्यालयाच्या क्षेत्रातील नागरिक हे महानगरपालिकेच्या हद्दीत येतात. तर पुणे शहरातील अनेक भाग हा करोना प्रादुर्भाव झालेला हॉटस्पॉट आहे. त्यामुळं या नागरिकांना परवानगी ही पोलीस प्रशासनाकडून दिले जाणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. तहसील कार्यालयाला लागूनच पोलीस पोलीस ठाणे आहे. पुणे शहरात रेड झोन आहे. अशी परिस्थिती असताना इथल्या नागरिकांना बाहेर जाण्यासाठी पोलीस मुख्यालयातून परवाने दिले जाणार आहेत. मात्र चुकीची माहिती मिळाल्याने गावी जाणार्‍या नागरिकांची गर्दी झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या