Saturday, April 27, 2024
Homeनगरपुणतांबा : संशयिताचा अहवाल निगेटीव्ह

पुणतांबा : संशयिताचा अहवाल निगेटीव्ह

पुणतांबेकरांचा जीव भांड्यात

पुणतांबा (वार्ताहर)- पुणतांबा येथील वाकडी फाट्या जवळ राहत असलेल्या करोना संशयित रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे ग्रामस्थांचा जीव भाडयांत पडला आहे. परवा रात्री सदर व्यक्तीस थंडीताप खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले काल उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुणतांबा येथे काल दिवसभर जनजीवन सुरळीत चालू होते. अहवाल कसा येतो यावर अनेक आराखडे ग्रामस्थांकडून केले जात होते कारण सबंधित व्यक्तीचे पंक्चरचे दुकान असल्यामुळे अनेकांना काळजी होती. मात्र ती व्यक्ती चार पाच दिवसांपासून थंडीतापाने आजारी असल्यामुळे तर्कवितर्क लावले जात होते. अहवाल जरी निगेटीव्ह आला तरी ग्रामस्थ व प्रशासनाने आणखी काळजी घेण्याची गरज स्पष्ट केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या