पुणतांब्याची ‘ती’ तरुणी निगेटीव्ह
Featured

पुणतांब्याची ‘ती’ तरुणी निगेटीव्ह

Sarvmat Digital

पुणतांबा (वार्ताहर)- मुंबईच्या पालघर तालुक्यातील भोईसर येथून आलेल्या पुणतांब्याच्या तरुणीला नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तीन दिवसापूर्वी दाखल केले होते. मात्र काल दुपारी त्या तरुणीचा अहवाल प्राप्त झाला असता त्या तरुणीचा अहवाल हा निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
मुंबईच्या भोईसर येथून आलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा कोणताही धोका नको म्हणून त्या तरुणीस पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले.

तपासणी दरम्यान तिच्या जिभेला, ओठाला आणि तोंडाला फोड आले असल्याचे दिसून आले. त्यानुसार हे कोरोनाचे लक्षण असू शकते. तिच्या बाह्य लक्षणावरुन पुढील काळजी घेण्यासाठी व खबरदारीसाठी पुढील उपचारासाठी तिला नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. या तरुणीचा अहवाल काल प्राप्त झाला असता तिचा अहवाल हा निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

अंदाजे 25 हजार लोकसंख्येच्या गावात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यामुळे गाव हादरून गेले होते काही जण वस्तीवर राहावयास गेले होते. तसेच प्रशासन सुध्दा सतर्क झाले होते. मात्र अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे पुणतांबेकरांना दिलासा मिळाला आहे. सरपंच डॉ. धनंजय धनवटे, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत महसूल व पोलीस विभाग ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी वर्ग कोणासही कोरोना प्रार्दूभाव होऊ नये म्हणून गेल्या 9 दिवसापासून अथक परिश्रम घेत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com