पानसनाला प्रकल्प शनिभक्तांसाठी उत्तम
Featured

पानसनाला प्रकल्प शनिभक्तांसाठी उत्तम

Sarvmat Digital

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी घेतले शनिदर्शन

सोनई (वार्ताहर) – पानसनाला प्रकल्प हा देशातील शनिभक्तांसाठी चांगला प्रकल्प असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी काढले. नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे काल शनिवारी माजी केंदीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शननिदर्शन घेतले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला व चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते.

सकाळी 11 वाजता मुळा पब्लिक स्कूलच्या हेलिपॅडवर पटेल यांचे आगमन झाले. त्यानंतर जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी गेले व त्यांची भेट घेतली. तेथे ना. गडाख यांनी पटेल यांचा सन्मान केला.

देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्हा परिषद अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांनी शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रफुल पटेल म्हणाले की शनी महाराजांचा महिमा हा देशातच नसून जगात आहे. मी शनिभक्त असून देशातील अनेक शनी मंदिरात जात असतो. येथे आल्यावर एक मोठी ऊर्जा तसेच समाधान मिळत असते. पानसनाला प्रकल्प हा देशातील भक्तांसाठी एक चांगला प्रकल्प असून विश्वस्त मंडळ अतिशय चांगले काम करत असल्याचे ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com