Friday, April 26, 2024
Homeनगरडाक कर्मचार्‍यांचा लाक्षणिक संप

डाक कर्मचार्‍यांचा लाक्षणिक संप

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील डाक कर्मचार्‍यांनीही एक दिवशीय लाक्षणिक संपामध्ये आपला सहभाग नोंदविला. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाविष्ट करून घ्यावे, प्रमोशनसाठी असलेली व्हेरी गुड बेंच मार्क ची जाचक अट रद्द करावी, टपाल खात्यातील रिक्त जागा ताबडतोब भरा, सरकारी विभागातील कंत्राटीकरण, खाजगीकरण व आऊटसोर्सिंंग ताबडतोब थांबवा, तसेच CSI, rict, csi आदी प्रणालीतील त्रुटी दूर करा आदी मागण्यांसाठी ऑल इंडिया एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विजय कोल्हे व ग्रामीण डाक सेवक संघटनेचे संघटन सचिव निवृत्ती जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर डाक विभागातील सर्व कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले.

सकाळी सर्व कर्मचार्‍यांनी येथील प्रधान डाक घरासमोर निदर्शने करून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी घोषणा दिल्या. यावेळी पोस्टमन संघटनेचे सचिव गणेश देशपांडे, ज्ञानेश्वर दोंड, अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, राजेंद्र गायकवाड, विजय कोल्हे, अभिजित कर्नावट, बी. डी. गोडगे, प्रसाद तर्‍हाळ, प्रतिमा आदिक, विमल मोहन, पूनम गीते, मीरा जगधने, प्रांजली ठाकरे, लबडे, नेटके, रोडे, उगले, कर्डक, साबळे, दंडवते, लासुरकर, ठाकरे, गोसावी, बनकर, पाचपिंड, अमोल मुळे, दुधाडे व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या