Wednesday, April 24, 2024
Homeनगरपोलीस आता परदेशी बाबुंच्या शोधात

पोलीस आता परदेशी बाबुंच्या शोधात

सचिन दसपुते

जामखेड प्रकरणानंतर प्रशासन कठोर : पोलीस ठाण्यांनाही सूचना

- Advertisement -

अहमदनगर – जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या आठ झाली आहे. एक रुग्ण बरा करण्यात डॉक्टरांना यश आले असले तरी अजून कोरोनाचे सात रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. सात पैकी दोन परदेशी व्यक्तींना कोरोनाची लागण झाली, तर तिघांना त्यांच्या संपर्कात आल्याने हा रोग झडला. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. परदेशी पाहूणांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासन घेत आहे. काही संपर्कातील व्यक्तींची तपासणी जिल्हा रुग्णालयात झाली आहे. परंतु, जिल्ह्यात अजून काही परदेशी व्यक्ती आहेत का, याचाही शोध जिल्हा पोलिसांनी सुरू केला आहे.

आयव्हरी कोस्ट, इराण, फ्रान्स, टांझानिया, जिबुती, बेनिन, डेकॉन, घाना आदी देशातून परदेशी पाहूणे दिल्ली येथील निजामउद्दीन परिसरात असलेल्या इंटरनॅशनल सेंटरमध्ये दाखल झाले. कायम येथे येणारे पाहुणे भारतभर भ्रमण करत असतात. परंतु, सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अशात या परदेशी पाहूण्यांनी भारतात आगमन केले. ते दिल्लीवरून चेन्नई, दिल्ली असा प्रवास करून नगरमध्ये आले. नगर शहरातील मुकुंदनगर, तसेच जामखेड, नेवासा, राहुरी, संगमनेर या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे जमावबंदी, संचारबंदी आहे. परदेशी पाहुण्यांची माहिती जिल्हा प्रशासनास देणे बंधनकारक आहे. जामखेडमध्ये 14 व नेवासा येथे 10 परदेशी पाहुण्यांना मस्जिदमध्ये वास्तव करू दिले. या प्रकरणी पोलिसांनी जामखेडच्या तीन व नेवाशाच्या दोन मस्जिद ट्रस्टीवर गुन्हा नोंदविला आहे. जामखेडमध्ये वास्तव्य केलेल्या फ्रान्सच्या एकाला व आयव्हरी कोस्टच्या एकास कोरोना लागण झाली.

त्यांच्या संपर्कात आलेल्या जामखेडच्या तिघांना कोरोना झाल्याचे समोर आले. परदेशी पाहुण्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासन घेत आहे. त्यांची तपासणी जिल्हा रुग्णालयात केली जात आहे. परदेशी पाहुण्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहे.

यामुळे जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जामखेड, नेवासा येथील मस्जिदमध्ये वास्तव केलेल्या परदेशी पाहुण्यांमुळे जिल्हा पोलीस सतर्क झाले आहे. दिल्ली येथून जिल्ह्यात आणखी काही परदेशी पाहुणे आले आहेत का, जिल्ह्यातील कोणत्या भागात, मस्जिदमध्ये वास्तव केले का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

जामखेडचा कार्यक्रम; किती जणांना भोवणार
परदेशी पाहुण्यांनी नगरमध्ये अनेक ठिकाणी मुक्काम केला. त्यांच्यातील दोघांना व संपर्कातील तिघांना कोरोना झाला आहे. पोलिसांनी त्यांनी वास्तव्य केलेला परिसर सील केला आहे. परंतु, जामखेडमध्ये एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी परदेशी पाहुण्यांबरोबर नगर शहरातील मुकुंदनगर, संगमनेर, नेवासा आदी तालुक्यातील व्यक्तींनी हजेरी लावली आहे. यामुळे परदेशी पाहुण्यांचा अनेकांशी संपर्क आला आहे. आता हाच संपर्क किती जणांना भोवणार, अजून कोरोनाचा आकडा किती वाढणार याची चर्चा जिल्हात आहे.

जामखेड, नेवासा येथे परदेशी लोकांनी वास्तव्य केल्याचे समोर आले आहे. असे बेकायदेशीर वास्तव्य जिल्ह्यातील इतर कोठे केले आहे का, याचा शोध आम्ही घेत आहोत. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना तशा सूचना दिल्या आहेत.
– डॉ. सागर पाटील, प्रभारी पोलीस अधीक्षक.

- Advertisment -

ताज्या बातम्या