Tuesday, April 23, 2024
Homeनगरपोलीस बंदोबस्तात मढीत गोपाळ समाजाच्या दोन होळ्या पेटल्या

पोलीस बंदोबस्तात मढीत गोपाळ समाजाच्या दोन होळ्या पेटल्या

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)- राज्यभरातील भटक्याची पंढरी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी पेटविण्याच्या मानपानावरून यावर्षी गोपाळ समाजाची मानाची होळी दत्तमंदिरा शेजारी तर दुसरी होळी गोपाळ समाजाच्या पारावर युवकांनी पेटविली. यामुळे आज गोपाळ समाजाच्या दोन होळ्या पेटविण्यात आल्या. जुनी नेते मंडळी कोणाचेे काही ऐकून घेत नाहीत. त्यामुळे आम्ही नवीन होळी सुरू करीत असल्याचा दावा युवकांनी केला आहे.

होळी पेटविण्याच्या मानावरून गोपाळ समाजात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभुमीवर मढीत सांयकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये मानाची होळी पेटविण्यात आली. कानिफनाथ महाराज की जय असा जयघोष नाथभक्तांनी केला. माणिक लोणारे, हरिदास काळापहाड, नामदेव माळी, पुंडलीक नवघरे, हरिभाऊ हंबीरराव व सुंदर गिर्‍हे यांनी होळी पेटविली.

- Advertisement -

आम्हाला मान हवा म्हणणार्‍या युवा पिढीने गोपाळ समाजाच्या मानाच्या पारावर वेगळी होळी पेटवून आम्हीच खरे मानकरी असल्याचे सांगितले. मढीत यावर्षी दोन होळ्या पेटल्या आहेत.गोपाळ समाजाचे सहा मानकरी पोलीस बंदोबस्तामध्ये गडावर गेले.तेथे देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, विश्वस्त आणि ग्रामस्थांनी मानाच्या गोवर्‍या गोपाळ समाजाच्या मानकर्‍यांना दिल्या.मानकरी गोवर्‍या घेऊन दत्तमंदिरा शेजारच्या बारवेजवळ आले. तेथे मानाची होळी पेटविण्यात आली.

गोपाळ समाजातील नवीन मानकर्‍यांना होळी पेटविण्याचा मान मिळावा यासाठी नवीन पिढीने पुढाकार घेतला आहे. सोमवारी दुपारी यात्रा समितीचे प्रशासकीय प्रमुख प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पोलिस उपअधिक्षक मंदार जवळे, तहसिलदार नामदेव पाटील,देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे,विश्वस्त सुनिल सानप,मिलींद चंवडके,आप्पासाहेब मरकड यांच्यामधे देवस्थानच्या मिटींग हाँलमधे बैठक झाली.

यावेळी जुन्याच मानकर्‍यांना होळीचा मान द्यावा असे प्रशासनाने देवस्थानच्या अध्यक्षांना व पदाधिकार्‍यांना सांगितले.सुमारे आठशे गोपाळ बांधवांनी यावर्षी होळी पोटविण्याचा मान पुंडलीक धनगर, शंकर पवार, भाऊसाहेब चौघुले, बाळासाहेब पवार, भरत गव्हाणे, पोपट गव्हाणे या सहा जणांना द्यावा अशी मागणी तहसिलदार नामदेव पाटील यांच्याकडे केली होती.ती फेटाळण्यात आली होती. अंकुश जाधव, संदीप जाधव, उमेश पवार, रमेश भोंगाळ, नितीन गव्हाणे, सुखदेव पवार, दत्तात्रय भोसले, अशोक गव्हाणे, दादासाहेब पवार, संतोष भोंगाळ, रामराव गव्हाणे, सुभाष गव्हाणे आप्पासाहेब जाधव यांच्या गटाने गोपाळ समाजाचा मानाचा पारावर होळी पेटविली.

आमचे म्हणणे ऐकुन घ्या असा आग्रह नव्या पिढीने जुन्या नेत्याकडे धरला.गोपाळ समाजाचा मेळावा पार पडला. मेळाव्यात बोलु दिले नाही म्हणून काही युवकांनी कार्यक्रम संपताच ध्वनीक्षेपकाचा ताबा घेतला आणि त्यांची भुमिका मांडायला सुरुवात केली. यावेळी किरकोळ गोंधळाचे वातावरण तयार झाले. मात्र मानाची होळी पेटविण्यासाठी समाजाची काही मंडळी निघुन गेली. त्यानंतर युवकांनी स्वतंत्र वेगळी होळी पेटविली.गोपाळ समाजाच्या दोन होळ्या मढीत पेटल्या आहेत.पोलिस उपअधिक्षक मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 70 पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या