Friday, April 26, 2024
Homeनगरनेवासा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; चौघांवर कारवाई

नेवासा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; चौघांवर कारवाई

सोनई (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद जाहीर केलेला असतानाही नगर-औरंगाबाद राज्यमार्गावर हॉटेल चालू ठेवल्याबद्दल तिघांवर तर शिंगणापूर पोलीस ठाणे हद्दीत याच कारणावरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर रमेश जरे, सचिन एकनाथ येळवंडे, बाबासाहेब लक्ष्मण जरे तसेच शिंगणापूर हद्दीतील वडाळा बहिरोबा येथील महेंद्र दिलीप पवार या चौघांवर भारतीय दंड विधान कलम 188 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 (1) चे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या