Friday, April 26, 2024
Homeनगरनगरमध्ये अडकलेल्या 1343 परप्रांतीय मजुरांच्या आशा पल्लवीत

नगरमध्ये अडकलेल्या 1343 परप्रांतीय मजुरांच्या आशा पल्लवीत

परजिल्ह्यातील 772 मजुरांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये गेले 36 दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात अडकून पडलेल्या वेगवेगळ्या राज्यातील 1 हजार 343 मजुरांच्या घरी जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यात 772 महाराष्ट्रातील मात्र परजिल्ह्यातील मजुरांचा समावेश आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या बुधवारच्या निर्णयानुसार आता वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्यांना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या सुचनेनुसार महाराष्ट्र सरकार काय सूचना देणार त्यानुसार जिल्ह्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात अथवा जिल्ह्यात पाठविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान सध्या हे मजूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या ठिकाणी निवारागृहात आश्रयाला असून त्यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाचा खर्च प्रशासन करत

आहे.
जिल्ह्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील 722, मध्यप्रदेशमधील 235, तामिळनाडूचे 41, आंध्रप्रदेशचे 4, उत्तरप्रदेशचे 134, छत्तीसगडचे 7, झारखंडचे 9, राजस्थानचे 88, उत्तराखंडचे 5, कर्नाटकचे 12, बिहारचे 12, तेलंगणाचे 7, हरियाणाचे 6, गुजरातचे 2, केरळचा 1, ओरीसाचा 1, पंजाबमधील 6 आणि पश्चिम बंगालचा 1 असे 1 हजार 343 मजूर प्रशासनाच्या निवार्‍यात आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे हे मजूर जिल्ह्यातून त्यांच्या घरी जाणार आहेत.

नगर जिल्ह्यात अन्य राज्यातील अथवा अन्य जिल्ह्यातील किती विद्यार्थी आहेत, याचा तपशील जमा करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील राजस्थान येथील कोटा आणि नवोदय विद्यालयात असणार्‍या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकारच्या सुचनांनुसार धोरण राबविण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

तालुकानिहाय अडकलेले मजूर
राहाता 142, नेवासा 52, राहुरी 56, श्रीरामपूर 76, नगर ग्रामीण 247, नगर मनपा हद्द 366, पारनेर 292, कर्जत 45 आणि पाथर्डी 15 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या