Thursday, April 25, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यात क्वारंटाईन केलेल्या तरुणाचा मृत्यू

पारनेर तालुक्यात क्वारंटाईन केलेल्या तरुणाचा मृत्यू

गावात उलटसुलट चर्चा : मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

पारनेर (प्रतिनिधी)– पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करून ठेवलेल्या 39 वर्षीय तरुणाचा मंगळवार (दि. 12) सकाळी मृत्यू झाला. 3 मे रोजी हा तरुण त्याच्या पत्नीसह दोन मुलांना घेऊन मुंबई येथील घाटकोपर येथून पिंप्री जलसेनला सासुरवाडीत आला होता.

- Advertisement -

दरम्यान, पिंप्री जलसेन येथे आल्यानंतर आरोग्य विभागाने चौघांच्या करोनाच्या चाचण्या केल्यानंतर सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. दम लागू लागल्याने हा तरूण सोमवारी निघोज येथील डॉक्टर असलेल्या त्यांच्या भावाकडे तपासणीसाठी गेला होता. डॉक्टर भावाच्या सल्ल्यानुसार हा तरुण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला. मंगळवारी सकाळी त्यास अधिक त्रास होऊ लागल्याने नगर येथे उपचारासाठी नेण्यात येत होते. मात्र वाटेतच त्याचे निधन झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले.

दरम्यान या तरुणाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आलेला असल्याने शवविच्छेदन झाल्यावरच या तरुणाच्या मृत्यूमागील निश्चित कारण समजू शकेल. गेली दोन दिवसांपूर्वी तो तपासणीसाठी गावात आल्यानंतर त्याच्या घरी तो गेला होता. त्यानंतर तपासणीसाठी आरोग्य केंद्रात गेला. तेथील डॉक्टरांना त्याने सर्व परिस्थिती सांगितली. मुंबईमध्ये घाटकोपर परिसरात तो राहत असून त्याठिकाणी सर्वाधिक रूग्णांची संख्या असल्याने गावी जाऊन सुरक्षित आरोग्य राहण्यासाठी त्याने सासुरवाडी असणार्‍या पिंप्री जलसेन येथे मुक्कामी थांबण्याचा निर्णय घेतला.

तेथील तपासणीनंतर त्याच्या कुटुंबातील सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने शाळेतच क्वारंटाईन केले होते. मात्र, पुन्हा दम्याचा त्रास होत असल्याने निघोज येथील दवाखान्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. तपासणीनंतर सोमवारी पुन्हा पिंप्री जलसेन येथे गेला. काल त्याला नगर येथे नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या