पारनेरच्या आयटीआयमध्ये रॅगिंग ?

पारनेरच्या आयटीआयमध्ये रॅगिंग ?

विद्यार्थ्यासह पालकांची प्राचार्यांकडे तक्रार, रॅगिंगचा व्हिडिओ व्हायरल

पारनेर (तालुका प्रतिनिधी)- पारनेर अळकुटी रोडवर असणार्‍या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका विद्यार्थ्याबरोबर इतर सहा ते सात विद्यार्थी रॅगिंग करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा रॅगिंगचा प्रकार की अन्य काही याचा तपास या औद्योगिक विकास प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांच्या समितीने सुरू केला असून या संबंधीची लेखी तक्रार संस्थेतील एका विद्यार्थ्यासह पालकांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने एक समिती नेमली असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य जाधव यांनी दिली.

या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वेल्डर या कोर्ससाठी देविभोईरेच्या एका विद्याथ्याने प्रवेश घेतला असून याच कोर्स मधील इतर सहा ते सात विद्यार्थ्यांनी वेळोवेळी अनेक मार्गाने या विद्यार्थ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधी प्राचार्यासह शिक्षकांना तक्रार केली असता याच सहा ते सात विद्यार्थ्यांनी अनेकवेळा त्याला मारहाण केली असल्याचे पीडित विद्यार्थ्याने सांगितले.

तर दुसरीकडे या प्रकरणाची अधिक शहानिशा करण्यासाठी संबंधित प्राचार्य व शिक्षकांनी या मुलांच्या पालकांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बोलावण्यात आल्याचे सांगितल्याची माहिती प्राचार्य जाधव यांनी दिली त्यामुळे हा रॅगिंग सारखा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राचार्याकडून घटनेस दुजोरा
पारनेर येथील शासकीय औद्योगिक विकास प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी हा प्रकार झाला असून देवीभोयरे येथील विद्यार्थ्याला गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान याच प्रशिक्षण संस्थेतील सहा ते सात विद्यार्थी मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे,याबाबत प्राचार्यांनी चौकशी समिती नेमली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com