पारनेर : अण्णा हजारे यांच्या आंदोलनात शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
Featured

पारनेर : अण्णा हजारे यांच्या आंदोलनात शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

Sarvmat Digital

पारनेर (ता. प्रतिनिधी)- महिलाच्या सुरक्षिततेसाठी व दिल्लीतील निर्भयाच्या आरोपीना फाशी, यासह महिलांच्या विविध प्रकारचे प्रश्नांवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या मौन आंदोलनात दुसर्‍या दिवशी शेकडो विद्यार्थ्यांनी पाठींबा दिला आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशभरात हेल्पलाईन सुरू करावी, महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात लवकर सुनावणी होऊन दोषींना शिक्षा द्यावी यासह काही प्रश्नाबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवार पासून राळेगणसिद्धीत मौन आंदोलन सुरू केले आहे.

शनिवारी सकाळी पारनेर पब्लिक स्कूलचे प्राचार्य गीताराम म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी फेरी काढली. त्यानंतर संत यादवबाबा मंदिरात जाऊन अण्णा हजारे यांच्या बरोबर मौन आंदोलनात सहभागी झाले. प्रा. दीपक जाधव यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी प्राचार्य गीताराम म्हस्के, प्रा. दीपक जाधव, नागेश्वर मित्रमंडळाचे प्रमुख अनिकेत औटी, समीर शेख, धीरज महांडुळे, राजेंद्र म्हस्के, प्रमोद गोळे यांच्यासह लातूर, पुणे येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

कोपर्डी, लोणी मावळा येथील निर्भयांना न्याय द्या
अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर पारनेर पब्लिक स्कूलच्या गौरी वाघमारे, श्रेया औटी, वेदांत औटी, विराज पठारे यांनी मनोगत व्यक्त करून कर्जत तालुक्यातील कोपर्डी, पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील निर्भयाच्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करावी अशी मागणी केली.

Deshdoot
www.deshdoot.com