Wednesday, April 24, 2024
Homeनगरपढेगाव दहेगाव रस्त्याचे निकृष्ट काम नागरिकांनी बंद पाडले

पढेगाव दहेगाव रस्त्याचे निकृष्ट काम नागरिकांनी बंद पाडले

कोपरगाव (प्रतिनिधी)- धामोरी, येसगाव, खिर्डीगणेश, पढेगाव ते दहेगाव लौकी पर्यंतचा मार्गला मंजुरी मिळुन वर्ष उलटले. त्यात पढेगाव ते दहेगाव बोलका रस्त्यावर डांबरमिश्रीत खडी टाकुन ठेकेदाराला आता दीड ते दोन वर्ष पुर्ण झाली. मात्र त्यावर डांबराचे अस्तरीकरण लवकर झालेच नाही.

अशी परिस्थिती असताना सध्या या पाच किमीच्या पट्ट्यात काम सुरु झाले खरे मात्र पुढे रस्त्याचे काम चालु असतानाच मागे रस्ता उखडत असल्याची शोकांतिका आहे. याबाबत दहेगाव आणि पढेगाव येथील नागरीकांनी काम बंद करुनही ठेकेदाराचा आडमुठेपणा आणि आर्थिक तडजोडी करणारा बांधकाम विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे.

- Advertisement -

या मार्गाने दोन पावसाळे चांगलेच खाल्यामुळे पूर्ण मार्ग चिखलाने माखला असून त्यावरील खडीही दिसत नाही. तरी त्यावर ब्रुमरने माती काढुन रस्ता साफ न करता रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे रस्त्यावरील खडीवर डांबर एकजिव होत नसल्यामुळे पुढे काम चालु तेच मागे रस्ता उखडत आहे.

याबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी प्रशांत वाघचौरे यांचेशी संपर्क साधुनही कामात कुठलीही सुधारणा झालेली नाही. हे काम ज्यांच्या देखरेखीखाली सुरु आहे असे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय भावसार कुणाचा फोनच उचलत नसल्यामुळे त्यांची बोलती ठेकेदाराने अगोदरच बंद केली की काय अशी नागरीकांत चर्चा आहे.

याबाबत दहेगाव आणि पढेगाव ग्रामपंचायतने काम निकृष्ट दर्जाचे होत असलेबाबत बांधकाम विभागाला तशे पत्रही दिले आहे. मात्र तरीही निर्ढावलेले बांधकाम प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधुन असल्यामुळे मुजोर ठेकेदाराने ब्रुमरचा वापर न करता काम सुरुच ठेवले असले तरी पढेगावच्या नागरीकांनी काम पुन्हा बंद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या