Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीगोंदा-जामखेडमध्ये भाजपच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन

श्रीगोंदा-जामखेडमध्ये भाजपच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन

चोंडी येथील घरासमोर माजी मंत्री राम शिंदे कुटुंबासह झाले सहभागी

श्रीगोंदा (प्रतिनिधी) –  महाविकास आघाडी सरकारने करोनासारख्या संकट काळात अतिशय निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप भाजप तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी करत भाजपच्या वतीने श्रीगोंद्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली येथील माऊली निवासस्थाना बाहेर हे आंदोलन करण्यात आले. तसेच माजी मंत्री प्रा. राम शिंदे त्यांच्या मुळगावी जामखेड तालुक्यातील चोंडी येथील घरासमोर पत्नी, माजी सभापती आशाताई राम शिंदे, अजिंक्य राम शिंदे, चोंडीचे सरपंच अभिमन्यू सोनवणे, चोंडी सेवा संस्थेचे चेअरमन विलास जगदाळे, उपसरपंच पांडुरंग उबाळे हे आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisement -

सरकार करोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी भाजप पदाधिकार्‍यांनी केला. शेतकरी, बाराबलुतेदार व असंघटित कामगारांना 50 हजार कोटींचे पॅकेज द्यावे. महाराष्ट्राकरिता विशेष आर्थिक पॅकेज घोषित करावेत. घर कामगार व बारा बलुतेदारांना आर्थिक मदत करावी. आधारभूत किमतीवर धान्य खरेदी चालू करावी. सरसकट संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, वीज बिल माफ करावे. शाळेची फी रद्द करावी.

शिधापत्रिका नसलेल्यांना धान्य द्या. शिवाय साखर, किराणा, डाळ देण्यास सुरुवात करावी. विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक यांच्या मोफत प्रवासाची सोय करण्यात यावी. खाजगी रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार करावेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे पैसे त्वरित द्यावे. शेतकर्‍याला बी-बियाणे खते मोफत उपलब्ध करून द्यावी. तीन महिन्यांचे घरभाडे माफ करावेत. या मागण्यां यावेळी नागवडे यांनी मांडल्या.

यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, संदिप नागवडे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, महिला अध्यक्ष सुहासिनी गांधी, दिपक शिंदे, संतोष क्षीरसागर, दत्ता जगताप, राजेंद्र उकांडे, दीपक हिरणावळे आदींसह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जामखेड तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या घरीच राहून या महाविकास आघाडीच्या सरकाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. जामखेडचे तालुका अध्यक्ष अजय काशीद यांनी व त्यांच्या कुटुंबियांसह आंदोलनात सहभागी झाले होते.

जामखेड पंचायत समितीच्या सभापती मनिषा रविंद्र सुरवसे आणि माजी तालुका अध्यक्ष रवी दादा सुरवसे यांनी खर्डा येथे या सरकाराच्या विरोधात आंदोलनात सहभागी झाले होते. माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी ही साकत या आपल्या गावात सहकुटुंब या आंदोलनात सहभागी झाले होते. तालुक्यातील खर्डा, अरणगाव, नान्नज, जवळा, चौडी, हाळगाव, दिघोळ, जातेगाव, सोनेगाव गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या