करोना – शुक्रवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक
Featured

करोना – शुक्रवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक

Sarvmat Digital

दिल्ली – करोना संकटावर विरोधीपक्षाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक शुक्रवारी (दि.22मे) दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन यांच्यासह 15 राजकीय पक्षांतील नेते सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या बैठकीत काँग्रेसकडून कोणी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत का याबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. या बैठकीत करोना आणि लॉकडाऊन लक्षात घेता केंद्र सरकारकडून उचलण्यात आलेली पाऊले, योजना, पॅकेज यासंदर्भात चर्चा होईल. तसेच केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना योग्य प्रतिसाद दिला जातो आहे का यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत ममता बॅनर्जी हजर होत्या. त्यावेळी केंद्राकडून भेदभाव होत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला होता. तसेच महाष्ट्रात अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत अन्न पुरवठा सुरू आहे. मात्र आमच्याकडे केवळ तांदूळ आहे, डाळ-गहू नाहीत ते केंद्राने द्यावेत अशी मागणी करून देखील ती मिळाली नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

या बैठकीत राज्यांनी केंद्राकडे केलेल्या मदत पॅकेज संदर्भात देखील चर्चा होईल. अनेक राज्यांनी मागणी करून देखील केंद्राकडून राज्यांसाठी पॅकेजची घोषणा करण्यात आलेली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com