Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशभारतीय सैन्य दलात अधिकारी आणि सैनिक होण्याची संधी

भारतीय सैन्य दलात अधिकारी आणि सैनिक होण्याची संधी

नवी दिल्ली – भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, प्रत्येकाला ते स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. अशीच इच्छा असणार्‍या देशातील युवकांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. भारतीय सैन्याने तीन वर्षांच्या इंटर्नशिप कार्यक्रमाची आखणी केली आहे. या कार्यक्रमाला टूर ऑफ ड्युटी असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये अधिकारी आणि सैनिक अशा दोन पदांचा समावेश आहे.

युवकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना जागृत ठेवण्याच्या उद्देशाने या योजनेची आखणी करण्यात आली आहे. आपल्या देशात बेरोजगारी एक वास्तव आहे, या सत्याचा स्वीकार करत सैन्याने तीन वर्षाच्या इंटर्नशिप कार्यक्रमाची आखणी केली आहे. ज्या युवकांना सैन्यदलामध्ये कायमस्वरुपी करिअर करायचे नाही, पण सैन्यातील थरार अनुभवायचा आहे. त्यांच्यासाठी तीन वर्षांसाठी टूर ऑफ ड्युटी कार्यक्रम आखण्यात आला आहे. इंटर्नशिप कार्यक्रमातंर्गत सैन्य दलात प्रवेशाच्या निकषामध्ये कुठलीही सवलत मिळणार नाही. या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे, अशी माहिती सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली. या प्रस्तावात सामान्य लोकांना ३ वर्षे सैन्यात नोकरी करून देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. हा प्रस्ताव स्वीकारला तरी टूर ऑफ ड्युटी प्रत्येकासाठी बंधनकारक असणार नाही. ३ वर्षांच्या इंटर्नशिपसाठी सैन्य दलात रुजू झाल्यानंतर मिळणारे वेतन करमुक्त असू शकते तसेच पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आणि सार्वजनिक नोकर्‍यांमध्ये प्राधान्य सुद्धा मिळू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या