Thursday, April 25, 2024
Homeनगरकोपरगावात सारी सदृश आजाराने महिलेचा मृत्यू

कोपरगावात सारी सदृश आजाराने महिलेचा मृत्यू

कोपरगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील संवत्सर मधील मनईवस्ती येथील एका 22 वर्षीय विवाहित महिलेचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. ही महिला सारी संशयित असल्याने मयत महिलेचे स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

ही महिला शुक्रवारी सकाळी 10 वाजेदरम्यान कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू असताना अवघ्या 20 मिनिटांत तिचा मृत्यू झाला. या अगोदरही सारीच्या आजाराने तालुक्यातील शिंगणापूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान सदर महिलेच्या मृतदेहावर कोपरगाव अमरधाम येथे प्रशासनाच्या निगराणीखाली शासकीय नियमावलीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच महिला ज्या भागात राहत होती. तो भाग प्रशासनाच्या वतीने सील करण्याचे काम सुरू आहे. महिलेच्या मृत्यूनंतर निर्जंतुकीकरण करण्यासाठी तात्काळ ग्रामिण रुग्णालयातील ओपीडी बंद करत सदर ओपीडी नगरपालिकेच्या रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. मयत महिलेस टीबीचा त्रास असल्याचेही डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या