Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्ह्यात लवकरच मद्याची ‘होम डिलिव्हरी’

जिल्ह्यात लवकरच मद्याची ‘होम डिलिव्हरी’

उत्पादन शुक्लकडून डिलिव्हरी बॉयला परवाने देण्यास सुरूवात

अहमदनगर (प्रतिनिधी)– राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर उडालेला गोंधळ लक्षात घेऊन आता घरपोहच दारूला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. दारुची होम डिलिव्हरी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचा परवाना गरजेचा आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच दारुची होम डिलिव्हरी सुरू होईल. तसेच, सुरुवातीला दारू दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून ती सुरू झाली आहेत. पंधरा दिवसांमध्ये सुमारे साडेदहा लाख लीटरपेक्षा जास्त दारुची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले आहे. करोना धोका होऊ नये म्हणून सुरुवातीला जिल्ह्यातील सर्व सरकार मान्य दारू दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने दारू विक्रीस परवानगी दिली आहे. दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर दुकानासमोर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने करोनाचा धोका होण्याची भिती व्यक्त होऊ लागली.

यावरून मोठे रणकंदन घडले. विविध प्रतिक्रिया उमटल्या. यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने घरपोच मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. त्यानुसार दारुची होम डिलिव्हरी सुरु करण्यात आली आहे. नगरमध्येही डिलिव्हरी बॉयने अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 17 डिलिव्हरी बॉयने मद्य घरपोच करण्याचा परवाना घेतला आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात दारुची होम डिलिव्हरी सुरू होईल.

मद्य विक्रीला 5 मे पासून सुरुवात झाली. दीड महिन्यानंतर दारुची दुकाने उघडल्याने पहिल्याच दिवशी तब्बल एक लाख लीटर दारुची विक्री झाली होती. त्यानंतर दिवसाला सरासरी 80 हजार लीटर दारुची विक्री होत आहे. आतापर्यंत सुमारे साडेदहा लाख लीटर दारू विक्री झाल्याचे सांगण्यात आले. घरपोच मद्य विक्री सुरू झाल्यानंतर मद्य विक्रीत वाढ होईल असा अंदाज आहे.

ज्यांना परवानगी दिली ते डिलिव्हरी बॉय लवकरच घरपोच मद्य विक्रीला सुरुवात करणार आहेत. अजूनही काही अर्ज येत आहे. घरपोच दारू पोहच करण्यासाठी अजूनही अर्ज करू शकतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यात आतापर्यंत सुमारे 20 हजार ग्राहकांनी दारुच्या होम डिलिव्हरीचा लाभ घेतला आहे. नगर जिल्ह्यात अजून सुरुवात झाली नसल्याने जिल्ह्यातील एकाही ग्राहकाला अजून घरपोच दारू मिळालेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या