Saturday, April 27, 2024
Homeनगरयंदा कांदा पेरणीला शेतकर्‍यांची पसंती

यंदा कांदा पेरणीला शेतकर्‍यांची पसंती

परतीच्या पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान झाल्याने पर्याय म्हणून कांदा पेरणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुन्हा रोप टाकून कांदा लागवड करण्यासाठी मोठा कालावधी लागणार होता. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांनी कांदा पेरणीला पसंती दिली. तालुक्यात अनेक शेतकर्‍यांनी कांदा पेरणी केल्याने कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे.

- Advertisement -

यावर्षी मोठ्या प्रमाणावर झालेल्या परतीच्या पावसामुळे हा रब्बी हंगाम लांबणीवर गेला आहे. ऊस, कांदा, गहू आदी पिकांची लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांची एकच धावपळ पाहायला मिळत आहे. कांद्याची लागवड आतापर्यंत सुरुच आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे आगोदर टाकलेल्या कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

कांदा लागवडीसाठी रोपच शिल्लक नसल्याने पुन्हा रोपे टाकली तर ते लावण्याच्या अवस्थेत येईपर्यंत किमान 45 ते 55 दिवसांचा कालावधी लागत असल्याने, शेतकर्‍यांनी पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात कांदा पेरणी केली आहे. पेरणी करण्यासाठी अद्यावत यंत्र उपलब्ध असल्याने काम सोपे झाले. सध्याच्या स्थितीतही कांदा पेरणी सुरू आहे.

कांदा पिकाबरोबरच शाश्वत दर मिळवून देणारे पीक म्हणून ऊसाची अंतर्गत पीक म्हणून लागवड करण्यात येत आहे. या वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने यावर्षी देखील कांदा चांगला भाव खावून जाईल, या अपेक्षेने तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी कांदा पेरणीला पसंती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या