एनआरसी, सीएए त्वरित लागू करा
Featured

एनआरसी, सीएए त्वरित लागू करा

Sarvmat Digital

नगरमध्ये हिंदू राष्ट्र सेनेचा समर्थन मोर्चा । पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात देशभरात मोर्चा निघत असताना नगरमध्ये मात्र त्याला समर्थन देणारा मोर्चा आज गुरूवारी निघाला. हिंदूराष्ट्र सेनेच्यावतीने हे दोन्ही कायदे तातडीने लागू करावेत यासाठी नगरमध्ये आज समर्थन यात्रा काढण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीभोवती पोलिसांचा बंदोबस्त होता.

हिंदुराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या नेतृत्वाखाली जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपूर्ण करून या समर्थन रॅलीस सुरुवात करण्यात आली. मार्केट यार्ड चौक, कोठी रोडवरून ही रॅली हातमपूर रोडवर पोलिसांनी अडवली. त्यानंतर भूमी अभिलेख येथील मैदानावर यात्रेचे सभेत रूपांतर झाले.

यावेळी कार्यकर्तेना मार्गदर्शन करताना देसाई म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयाचे पक्षविरहित मी स्वागत करतो. हिंदू अगोदर नंतर मंत्री अन् त्यानंतर ते पक्षाच आहेत. त्यामुळे त्यांनी तातडीने सीएए व एनआरसी हे दोन्ही कायदे तातडीने लागू करावे. काश्मीर मध्ये कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसवर हल्ले करणार्‍यांना तातडीने बाहेर काढण्याची गरज आहे. देशासोबत गदारी करणार्‍यांना देशा बाहेर हाकलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com