Saturday, April 27, 2024
Homeनगरनेवाशातील सोसायट्यांचे 134 प्रतिनिधी निवडणार जिल्हा बँकेचा एक संचालक

नेवाशातील सोसायट्यांचे 134 प्रतिनिधी निवडणार जिल्हा बँकेचा एक संचालक

बिगर शेती तसेच शेतीपुरक संस्था जिल्ह्यातून देणार प्रत्येकी एक संचालक; राखीवच्या 5 जागा निवडणार सर्व मतदार

नेवासा (का. प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एप्रिल 2020 मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी नेवासा तालुक्यातील सहकारी संस्थांच्या आकडेवारीचे काम पूर्ण झाले असून नेवासा तालुक्यातील एकूण 290 सहकारी संस्था व अन्य संस्था यांचे प्रतिनिधी मतदान करू शकणार आहेत. यापैकी 134 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सर्व 134 मतदार तसेच उर्वरीत केवळ 100 संस्थांचे मतदार सध्याच्या परिस्थितीत पात्र ठरणार असल्याच्या अंदाज आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बँकेच्या 21 संचालकांच्या निवडीसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होत असून त्यासाठी प्रारुप मतदार याद्या निश्चितीचे काम सध्या सुरू आहे. एकूण 21 संचालकांपैकी 14 तालुक्यांतील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यातून एक असे एकूण 14 संचालक निवडले जाणार आहेत. संबंधित सहकारी संस्थेचा ठराव झालेला प्रत्येक एक प्रतिनिधी या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून देणार आहे. नेवासा तालुक्यात अशा 134 संस्था असून या सर्व संस्थांमधून निवडला गेलेला प्रत्येकी एक प्रतिनिधी तालुक्यातून एक उमेदवार निवडून देणार आहे.

त्याशिवाय शेतीपुरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदार संघातून एक संचालक, बिगर शेती संस्था मतदारसंघातून जिल्ह्यातून एक, महिला प्रतिनिधी-2, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील एक सदस्य, इतर मागासवर्गातील एक सदस्य त्याचबरोबर विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील एक सदस्य असे अन्य 7 सदस्य निवडले जाणार असून त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे तसेच वैयक्तीक मतदार मतदान करणार आहेत.

नेवासा तालुक्यातील जवळपास 127 गावांतून 134 विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्या आहेत. यामधून एक सदस्य निवडला जाईल.
त्याशिवाय प्राथमिक सहकारी नागरी बँकांमधून एकूण 58 संस्था आहेत. यात ग्रामीण- 48, नोकरदार पतपुरवठा संस्था 9 तर प्राथमिक स्तर नागरी बँक 1 यांचा समावेश आहे.

नेवासा तालुक्यात तालुका खरेदी विक्री संघ-1 आहे. त्याचबरोब प्राथमिक फळे भाजीपाला संस्थांची संख्या 2 आहे. दोन सहकारी साखर कारखाने आहेत. बलुतेदार संस्थांमध्ये नेवासा तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ ही एकमेव संस्था आहे. औद्योगिक वसाहत संस्थेत भाऊसाहेब पटारे पाटील औद्योगिक सहकारी संस्था या एकमेव संस्थेचा समावेश आहे.

मध्यवर्ती ग्राहक भांडारमध्ये मुळा मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार या एकमेव संस्थेचा समावेश आहे. प्राथमिक सहकारी ग्राहक भांडारच्या 4 संस्था असून त्यामध्ये तुकाराम सहकारी भांडार, श्रीराम सहकारी भांडार, शरद सहकारी भांडार तसेच नेवासा तालुका लॉयर्स कन्झुमर्स सोसायटी यांचा समावेश आहे.

नेवासा तालुक्यात 6 ग्रामीण गृहनिर्माण संस्था आहेत. मजूर संस्थांची (बिगर आदिवासी) संख्या नेवासा तालुक्यात 58 इतकी आहे.
वाहतूक संस्थांची संख्या 3 आहे. त्यात ज्ञानेश्वर मोटार वाहतूक संस्था (भेंडा), परमानंद मोटार वाहतूक संस्था (खेडलेपरमानंद) तसेच नेवासा तालुका मोटारवाहतूक संस्था (सोनई) यांचा समावेश आहे.

इतर बिगर पतपुरवठा (महिला) संस्था 2 आहेत. त्यात पारिजात महिला पतपुरवठा संस्था (भेंडा) व नाथबाबा महिला बालविकास संस्था (नेवासा बुद्रुक) या संस्थांचा समावेश आहे.

उपसा जलसिंचनाची एक संस्था आहे. पाणीपुरवठा व पाणीवापर संस्थांची संख्या 5 असून त्यामध्ये घोडेश्वरी पाणीवापर संस्था (घोडेगाव), मुळा खोरे पाणीपुरवठा (मोरेचिंचोरे), मुळा पाणीपुरवठा (मांडेगव्हाण), गोविंद उपसा जलसिंचन (खुपटी), यशवंत सहकारी पाणीवापर संस्था पानसवाडी, साइरबाबा पाणीपुरवठा (महालक्ष्मी हिवरे) यांचा समावेश आहे.

इतर संस्था (अभिनव)- या संस्थांची तालुक्यातील संख्या दहा असून त्यामध्ये श्रीनाथ स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था (नेवासा बुद्रुक), नाथ हमाल कामगार सहकारी संस्था (चांदा), श्रीगजानन हमाल कामगरा सहकारी संस्था (नेवासा), श्री संतकृपा शेतकरी विकास सहकारी संस्था (वंजारवाडी), श्रीनाथ शेतकरी विकास सहकारी संस्था (चांदा), हॅण्डपंप यांत्रिकी सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था (कुकाणा), महाराष्ट्र संगणक सहकारी संस्था (नेवासा), मुक्ताई बहुउद्देशीय सहकारी संस्था (भेंडे बुद्रुक), समर्थ अभिनव शेतकरी शेतीमाल सहकारी संस्था (सुकळी), हरिओम बहुउद्देशीय सहकारी संस्था (गिडेगाव) यांचा समावेश आहे.

तालुका सपुरवायझिंग युनियनमध्ये नेवासा तालुका सहकारी देखरेख संघ मर्यादीत ही एकमेव संस्था आहे. अशाप्रकारे नेवासा तालुक्यात एकूण सहकारी पतपुरवठा सोसायट्या 134 तर अन्य संस्था 156 असे एकूण 290 सहकारी सोसायट्या, संस्था आहेत. यापैकी 134 सोसायट्यांचे प्रतिनिधी जिल्हा बँकेत एक प्रतिनिधी निवडून देणार आहे.

तर अन्य संस्थांमधील शेतीपुरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्थांचे मतदार जिल्ह्यातून एक प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करतील. बिगर शेती संस्था मतदार संघातून जिल्ह्यात एक प्रतिनिधी निवडला जाणार आहे. त्यासाठी नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, नागरी सहकारी बँका, पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था, ग्राहक संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, औद्योगिक संस्था, ग्रामोद्योग संघ, वाहतूक संस्था यांचा समावेश आहे.

नेवासा तालुक्यातील सहकारी संस्था

वि. कार्यकारी सहकारी संस्था                 134
प्राथ. सहकारी (नागरी बँका)                    58
तालुका खरेदी-विक्री संघ-                          1
प्राथ. फळे भाजीपाला संस्था                       2
साखर कारखाने-                                     2
बलुतेदार संस्था                                       1
औद्योगिक वसाहत                                   1
मध्यवर्ती ग्राहक भांडार                             1
औद्योगिक वसाहत                                   1
मध्यवर्ती ग्राहक भांडार                             1
प्राथ. सहकारी ग्राहक भांडार                     4
गृहनिर्माण संस्था (ग्रामीण)                        4
मजूर संस्था (बिगर आदिवासी)                58
वाहतूक संस्था                                        3
इतर बिगर पतपुरवठा (महिला)                 2
पाणीपुरवठा/पाणीवापर                           5
उपसा जलसिंचन                                   1
इतर (अभिनव)                                    10
तालुका सुपरवायझिंग युनियन                   1
एकूण संस्था                                      290

- Advertisment -

ताज्या बातम्या