बुधवारी नेवाशात ऑनलाईन अर्जांची होळी व बोंबाबोंब आंदोलन
Featured

बुधवारी नेवाशात ऑनलाईन अर्जांची होळी व बोंबाबोंब आंदोलन

Sarvmat Digital

2017-18 ची पीकविमा रक्कम देण्याची मागणी

नेवासा (का. प्रतिनिधी) – 2017-18 मध्ये भीषण दुष्काळाच्या काळातील पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांना अद्यापही देण्यात न आल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांनी बुधवार दि. 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजता नेवासा तहसीलवर बोंबाबोंब आंदोलन करून ऑनलाईन भरलेल्या अर्जांची होळी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन भारतीय जनसंसदचे तालुकाध्यक्ष रामराव पाटील भदगले यांनी दिली.

याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, 2017-18 वर्षात राज्यात भीषण दुष्काळ पडला. सरकारकडून दुष्काळही जाहीर झाला. त्यावर्षी पंतप्रधान शेती विमा कंपनीकडे शेतकर्‍यांनी लाखो रुपयांचा पीकविमा भरलेला होता. मात्र दुष्काळ जाहीर होऊनही विम्याचा परतावा न देऊन विमा कंपनीने शेतकर्‍यांची फसवणूक व विश्वासघात केला आहे.

शेतकर्‍यांच्या झालेल्या या फसवणूक व विश्वासघाताच्या निषेधार्थ बुधवार दि. 18 मार्च रोजी नेवासा तहसील कार्यालयासमोर नेवासा तालुक्यातील शेतकरी बोंबाबोंब आंदोलन करुन ऑनलाईन भरलेल्या अर्जांची होळी करणार असल्याचा इशारा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संघटनेने दिला आहे.

निवेदनावर भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन भारतीय जनसंसदचे तालुकाध्यक्ष रामराव भदगले, शहराध्यक्ष राजेंद्र पोतदार, कारभारी गरड, अशोकराव ढगे, अ‍ॅड. विठ्ठलराव जंगले, एस. आर. शिंदे, शिवाजीराव चव्हाण यांची नावे आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com