नेवाशात तीन महिने निवडणुकांचा धुराडा
Featured

नेवाशात तीन महिने निवडणुकांचा धुराडा

Sarvmat Digital

दोन साखर कारखाने व 53 सोसायट्यांसह 84 संस्थांच्या व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपणार

फेब्रुवारीत 12, मार्चमध्ये 7 तर एप्रिलमध्ये 34 सोसायट्यांसह तीन महिन्यांत 18 पतसंस्थांमध्ये येणार नवे व्यवस्थापन

नेवासा (का. प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील 290 सहकारी संस्थांपैकी 2 साखर कारखान्यांसह 116 सहकारी संस्थांच्या निवडणुका या वर्षात होणार आहेत. मात्र असे असले तरी पहिल्या तीन महिन्यांतच दोन साखर कारखान्यांसह 84 संस्थांची मुदत संपत असल्याने नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रासाठी पहिले तीन महिने निवडणुकांचे असून त्यादृष्टीने गावोगाव हालचाली सुरू झाल्या आहेत.

तालुक्यात 134 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आहेत. त्यापैकी 61 सोसायट्यांचा कार्यकाल या वर्षात संपत आहे. त्यातील 53 सोसायट्यांचा कार्यकाल पहिल्या तीन महिन्यांतच संपत असून त्यांच्या निवडणुका होत आहेत. जानेवारीत 12 सोसायट्यांचा, फेब्रुवारी 7 तर मार्चमध्ये 34 सोसायट्यांचा कार्यकाल संपणार आहे. जानेवारीत कार्यकाल संपत असलेल्या 12 सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम फेब्रुवारीत, फेब्रुवारीत कार्यकाल संपणार्‍या सोसायट्यांच्या निवडणुका मार्चमध्ये तर मार्चमध्ये कार्यकाल संपणार्‍या संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होऊन नवीन व्यवस्थापन मंडळे सत्तेवर येतील.

नेवासा तालुक्यातील उर्वरीत सोसायट्यांमध्ये जुलै व ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी एका तर ऑगस्टमध्ये दोन व सप्टेंबरमध्ये तीन अशा एकूण 61 सोसायट्यांच्या निवडणुका या वर्षात पार पडणार असल्या तरी पहिल्या तीन महिन्यातच 53 सोसायट्यांच्या निवडणुका त्याचबरोबर 18 पतसंस्थांच्या निवडणुकाही या काळात होणार आहेत.

सोसायटी निवडणुकीचा कार्यकाल संपल्यावर साधारण महिनाभरात निवडणूक प्रक्रिया पार पडून नवीन संचालक मंडळ अधिकारावर येते.
जानेवारीत कार्यकाल संपणार्‍या क वर्गातील 12 संस्थांचा समावेश असून त्यामध्ये एक कर्मचारी पतसंस्था व 11 एक कोटीपेक्षा कमी वसूल भागभांडवल असलेल्या संस्था आहेत.

नेवासा तालुका को ऑपरेटीव्ह मर्चन्ट स्टाफ सेवक सहकारी पतसंस्था संचालक मंडळाचा कार्यकाल 30 जानेवारी रोजी संपत आहे.
जानेवारीमध्ये कार्यकाल संपणार्‍या नागरी ग्रामीण सहकारी पतसंस्था- जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था नेवासा (19 जानेवारी), सिद्धेश्वर ग्रामीण बिगरशेती प्रवरासंगम (17 जाने.), धनश्री महिला ग्रामीण बिगरशेतरी नेवासा (20 जाने.), भाऊसाहेब देशमुख ग्रामीण बिगरशेती कुकाणा (17 जाने.), दामू अण्णा फाटके ग्रामीण बिगरशेती खरवंडी (23 जाने.), स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती भेंडा बु. (20 जाने.), संत नागेबाबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था भेंडा बुद्रुक (20 जाने.), श्री शनैश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था शिंगणापूर (23 जाने.), तुकाईदेवी ग्रामीण बिगरशेती शिंगवेतुकाई (27 जाने.), भाऊसाहेब पाटील पटारे ग्रामीण बिगरशेती मुकिंदपूर (18 जाने.), श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती बेलपिंपळगाव (20 जानेवारी).

ड वर्गातील आदिनाथ मजूर सहकारी संस्था मर्यादीत कौठा या संस्थेचा कार्यकाल 26 जानेवारी रोजी संपत असून या संस्थेचीही निवडणूक फेब्रुवारीत होणार आहे. त्याशिवाय फेब्रुवारी 2019 मध्ये नवीन नोंदणी झालेल्या समर्थ अभिनव शेतकरी शेतीमाल सहकारी संस्था सुकळी या संस्था संचालकांचा कार्यकाल 31 जानेवारीपर्यंत असून या संस्थेचीही फेब्रुवारीत निवडणूक होणार आहे.

अशा प्रकारे नेवासा तालुक्यातील ब वर्गातील 12 विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्या, क वर्गातील 11 ग्रामीण पतसंस्था व एक कर्मचारी पतसंस्था तसेच ड वर्गातील एक मजूर सहकारी संस्था (आदिनाथ, कौठा) व एक अभिनव शेतकरी शेतीमाल सहकारी संस्था अशा तिन्ही वर्गातील एकूण 26 सहकारी संस्थांची मुदत जानेवारीत संपत असल्याने या सर्व संस्थांची निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारीत पार पडणार आहे.

दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकाही मार्च-एप्रिलमध्ये

नेवासा तालुक्यातील 74 सहकारी संस्थांच्या निवडणुका पहिल्या तीन महिन्यात होत असतानाच तालुक्यात असलेल्या दोन्हीही सहकारी साखर कारखान्यांची मुदत मार्चमध्ये संपत असल्याने या कारखान्यांच्या निवडणुकाही मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापन समितीचा कार्यकाल 27 मार्च रोजी तर मुळा सहकारी साखर कारखाना सोनई या कारखान्याच्या कार्यकाल 22 मार्च रोजी संपत आहे. या दोन्ही कारखान्यांमध्ये प्रत्येकी 21 संचालक निवडून जाणार आहेत. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच मोठ्या संख्येने सहकारातील निवडणुका होत असल्याने नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते व शेतकर्‍यांना महत्व येणार आहे.
जानेवारी ते मार्च मुदत संपणार्‍या नेवाशातील
53 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या

जानेवारी (12 सोसायट्या)

गोमळवाडी (18 जानेवारी), नाथकृपा वाटापूर (18 जाने.), गणेश धनगरवाडी (18 जाने), जयमल्हार महालक्ष्मी हिवरे (18 जाने.), भाऊसाहेब पाटील थोरे पाथरवाला (20 जाने.), शिंगवेतुकाई (20 जाने.), खंडेश्वरी सुकळी (23 जाने.), संत गोविंदबाबा शिरेगाव (26 जाने.), चांदगाव (26 जाने.), मुकिंदपूर (26 जाने.), राजेंद्र भंडारी विविध कार्यकारी सेवा संस्था कुकाणा (27 जाने.), रामदास पाटील कोरडे विविध का. सोसायटी खेडलेकाजळी (27 जाने.)

फेब्रुवारी (7 सोसायट्या)
चिलेखनवाडी (12 फेब्रुवारी), झापवाडी (12 फेब्रुवारी), भैरवनाथ म्हसले (12 फेब्रु.), संत तुकाराम पिचडगाव (15 फेब्रु.), गंगामाई बेलपांढरी (21 फेब्रु.), बजरंग पानसवाडी (25 फेब्रु.), महालक्ष्मी हिवरे (26 फेब्रु.).

मार्च (34 सोसायट्या)

यशवंत गळनिंब (3 मार्च), सोनई नं. 2 ( 4 मार्च), लांडेवाडी (4 मार्च), नारदमुनी नेवासा बुद्रुक (4 मार्च), खुणेगाव (6 मार्च), मोरयाचिंचोरे (6 मार्च), रांजणगाव (6 मार्च), सुलतानपूर (7 मार्च), उस्थळ दुमाला (7 मार्च), बकुपिंपळगाव (6 मार्च), गोंडेगाव (8 मार्च), शिरेगाव (8 मार्च), घोडेगाव (8 मार्च), गोणेगाव (8 मार्च), खेडलेपरमानंद (8 मार्च), लोहोगाव (8 मार्च), मंगळापूर (8 मार्च), खडके (8 मार्च), रामडोह (9 मार्च), अनंत पुनतगाव (9 मार्च), जळके बुद्रुक (12 मार्च), पाथरवाला (12 मार्च), निपानी निमगाव (12 मार्च), श्री हनुमान बेलपिंपळगाव (12 मार्च), कौठा (15 मार्च), गोधेगाव (15 मार्च), नेवासा खुर्द (15 मार्च), पाचेगाव (15 मार्च), जळके खुर्द (17 मार्च), पाचुंदा (17 मार्च), नेवासा बुद्रुक (19 मार्च), माका (21 मार्च), बर्‍हाणपूर (21 मार्च), फत्तेपूर (21 मार्च).

Deshdoot
www.deshdoot.com