Friday, April 26, 2024
Homeनगरनेप्तीचा कांदा बाजार उद्यापासून सुरू

नेप्तीचा कांदा बाजार उद्यापासून सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊन काळात तब्बल अडीच महिने बंद असलेला नगरचा कांदा बाजार उद्या गुरूवारपासून सुरू होत आहे. लॉकडाऊनचे सगळे नियम पाळून कांदा लिलाव होणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे 24 मार्चपासून लॉकडाऊनमुळे नेप्ती उपबाजार आवारातील कांदा मार्केट बंद आहे. आडते व्यापारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उद्या (गुरुवार)पासून ते सुरू होत आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव विचारात घेता बाजार आवारामध्ये येणारे शेतकरी, आडते व्यापारी, माथाडी कामगार, मापाडी, स्त्री हमाल कामगार व इतर घटकांची आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे बाजार आवारात येणार्‍या प्रत्येक इसमाची प्रवेशद्वारावरच स्कॅनिंग मशिनद्वारे शरीरातील तापमान मोजून खात्री करूनच बाजार आवारात प्रवेश देण्यात यावा.

त्याचप्रमाणे माथाडी कामगारांना काम करताना मास्क, हॅण्डग्लोज, गम शूज, सेनिटायझर पुरविणे अतिशय महत्वाचे आहे. तसेच कामगारांना हात धुणेसाठी हॅण्डवॉश, साबण व पिण्यासाठी शुद्ध पाणी इत्यादी वस्तू पुरविण्याबाबत आडते व्यापारी किंवा संबंधित घटकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने अध्यक्ष अविनाश घुले यांनी स्व. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खबरदारी घेण्याची मागणी
सामाजिक अंतर पाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने लक्ष घालून गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन बाजार आवारात येणारे शेतकरी, आडते व्यापारी, माथाडी कामगार, मापाडी, स्त्री हमाल कामगार इतर घटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही, अशीही मागणी अविनाश घुले यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या