मेडिकलच्या ‘नीट’ परीक्षा संदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय !
Featured

मेडिकलच्या ‘नीट’ परीक्षा संदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय !

Sarvmat Digital

दिल्ली – देशभरातील मेडिकल आणि डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट परीक्षा सक्तीची असणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान दिला आहे.

खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले, नीट परिक्षेमार्फत मेडिकल आणि डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे. तो कोणत्याही विद्यालयात प्रवेशादरम्यान होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने नीटसंदर्भातील एक याचिका फेटाळून लावली असून त्यामध्ये नीट परीक्षा खाजगी संस्थांच्या व्यापार आणि व्यावसायाशी निगडीत संविधानिक अधिकारांमध्ये दखल देते असल्याचं नमूद करण्यात आलं होते.

Deshdoot
www.deshdoot.com