Blog : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’
Featured

Blog : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’ मातृभाषा आहे म्हणून मराठीच कौतुक आहे. धरणीच्या पोटातून जिचा उगम झाला त्या मराठी मायबोलीचा सर्वांना विसर पडावा, तिची लाज वाटावी ही खरं तर खंताची बाब आहे. मराठी भाषेची लाज वाटण्या सोबतच तिचं विस्मरण अधिक होत चालले आहे, असे मला वाटते. पाश्र्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि आजच्या स्पर्धेच्या जगात मराठीला मिळत असलेले दुय्यम स्थान तसंच बदलती जीवनशैली आणि मराठी शाळेची घसरणारी संख्या या सर्वांमुळे मराठी भाषा व्यवहारात कमी येते आणि मग त्याला पर्याय म्हणून इतर भाषांचा वापर केला जातो.

मराठी भाषेच्या संवर्धनाचा विचार करतांना ती जिवंत राहाणार आहे आणि आता आपण ती जिवंत ठेवणार आहोत हे पहिल्यांदा आमलात आणावं तरच मराठी भाषेच अस्तित्व टिकू शकत. मराठी भाषा येण्यासाठी ‘मराठी साहित्य’ वाचणे गरजेचे आहे. इंग्रजी, हिंदी, हिंग्लीश भाषेच बोलणं हे कूल आणि फंकीपणाच लक्षण मानलं जातं. आपल्या मायबोलीचा गोडवा नेहमीच हवाहवासा वाटतो. राज्याची बोलीभाषा ही त्याची मुख्य ओळख आणि शान असते. ही ओळख रहिवाशांकडून जपली गेली पाहिजे.

आपण मराठी भाषिकांनी कायम मराठीचा अभिमान बाळगला तर परभाषीय लोकांकडून सुद्धा मराठी भाषेला सन्मान मिळेल. मराठी भाषेविषयीची आपुलकी, प्रेम हे फक्त २७ फेब्रुवारीपर्यंत मर्यादित न राहता सदैव जपलं गेलं पाहिजे. मराठी तरुण- तरुणींनी मराठी भाषेची गर्व बाळगला पाहिजे. ‘आमच्या नसा-नसात स्पंदते मराठी’ असं म्हणत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे वाटते.

-मृणाल पाटील, बी.वाय.के.कॉलेज.

Deshdoot
www.deshdoot.com