इगतपुरीहुन मजुरांसाठी विशेष बसची व्यवस्था; जिल्हयातुन पहिली बस मध्यप्रदेशकडे रवाना

इगतपुरीहुन मजुरांसाठी विशेष बसची व्यवस्था; जिल्हयातुन पहिली बस मध्यप्रदेशकडे रवाना

इगतपुरी : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत जाता यावे यासाठी रविवारी रात्री १२ वाजता कसारा घाटातील घाटनदेवी मंदिराजवळ असलेल्या चेकपोस्टवरून इगतपुरी आगाराच्या चार बस मध्यप्रदेशच्या दिशेने सोडण्यात आल्या. विशेष म्हणजे नाशिक जिल्हयातुन काल रात्री १२ वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशकडे जाणारी पहीली बस सोडण्यात आली.

तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड व घोटी कृषि ऊत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे बस मिळणेबाबत मागणी केली होती. छ्गन भुजबळ यांनी या मागणी बाबत सकारात्मक विचार करून बसची व्यवस्था केल्याने कसारा घाटातून पायी चालत जाणाऱ्या हातमजुरांना या बसमधून त्यांच्या राज्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यामुळे पायी चालत जाणाऱ्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या रेल्वेकडून परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, या गाड्यांतून लोकांची वाहतूक करण्यास मर्यादा असल्याने अनेकजण अजूनही महाराष्ट्रातच अडकून पडले आहेत. याशिवाय, अनेकांकडे रेल्वेचे तिकीट आणि वैद्यकीय प्रमाणपत्रासाठीही पैसे उरलेले नाहीत. त्यामुळे अनेक मजूर पायीच आपल्या गावाकडे चालत निघाले आहेत. दि.९ रोजी शनिवारी या परप्रांतीयांमुळे मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात वाहतुकीची कोंडी होऊन चार ते पाच तास महामार्ग ठप्प झाला होता.

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढवल्याने पायी चालत निघालेल्या मजुरांचे तांडेच्या तांडे महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर दिसत आहेत. या मजुरांच्या कुटुंबीयांचे होणारे हाल पाहून अनेकांच्या काळजाचे पाणी होत होते. मात्र, बससेवेमुळे आता या हातमजुरांची ही पायपीट थांबण्याची शक्यता आहे.

कारण नाशिकमध्येही शनिवारी रात्री पायी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी स्थानिक प्रशासनाकडून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय स्तुत्य असल्याचे गोरख बोडके यांनी सांगितले.

बसने मोफत प्रवास यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, इगतपुरीचे आगारप्रमुख संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, शहराध्यक्ष वसीम सैयद, चेकपोस्टवर तैनात असलेले महसूल, आरोग्य, ग्रामविकास विभागाचे कर्मचारी अनिल बाविस्कर, भिमा भले, प्रकाश देवरे, संजय सातपुते, अनिल जाधव, निजाम खान, पोलीस हवालदार मुकेश महीरे, मारूती दराडे, वैभव वाणी आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com