पंतप्रधान आज रात्री पुन्हा देशाला संबोधित करणार
Featured

पंतप्रधान आज रात्री पुन्हा देशाला संबोधित करणार

Sarvmat Digital

दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रभाव बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा सायंकाळी ८ वाजता कोरोना विषाणूच्या मुद्यावर देशाला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ मार्चला देशाला संबोधित करून जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. देशात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०० वर गेली असून आतापर्यंत १० रुग्णाचे मृत्यू झाले आहेत. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारतर्फे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. बर्‍याच राज्यात कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com