शिवसेनेचे 35 आमदार नाराज – राणे
Featured

शिवसेनेचे 35 आमदार नाराज – राणे

Sarvmat Digital

ठाणे – भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, कारण शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी 35 जण नाराज आहेत, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी ठाण्यातील वर्तक नगर येथे झालेल्या मालवणी महोत्सवात केला आहे. तसेच या सरकारला कायमची सत्ता दिली नाही, आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा कॅबिनेटमध्ये केली होती. तसेच त्याचा जीआर काढला असला तरी देखील कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या तारखेचा उल्लेख नाही, त्याचबरोबर कर्जमाफी कधी मिळेल हे सांगता येत नाही तसेच भाजप कोणाकडे गेले नव्हते, शिवसेना स्वतः आली होती.

विशेष म्हणजे भाजप केंद्रात आहे आणि महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार आहे. त्यामुळे भाजपला कोणाची फिकीर करण्याचे गरज नाही. महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेकडे 54 पैकी 35 जणांमध्ये नाराजी आहे, मनसे आणि भाजपबाबत मी काहीही बोलणार नाही ते पक्षाचे प्रमुख बोलतील असेही ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com