Saturday, April 27, 2024
Homeनगरनगर, संगमनेर, राहुरी येथील अहवाल निगेटिव्ह

नगर, संगमनेर, राहुरी येथील अहवाल निगेटिव्ह

14 जणांना दिलासा : पाथर्डीच्या रुग्णांची करोनावर मात

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले 14 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर पाथर्डी येथील करोना बाधित व्यक्तीला शुक्रवारीच डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 41 झाली आहे.

- Advertisement -

शनिवारी सायंकाळी प्रलंबित असणार्‍या 14 करोना संशयित व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात शेवगाव येथील 1, जामखेड 2, संगमनेर 1, राहाता 2, नगर शहर 5, अकोले 1, राहुरी 1 आणि कोपरगाव येथील 1 व्यक्तींच्या अहवालाचा समावेश आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथील मोहोज देवढे येथील शेतकरी करोना बाधित झाल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने रुग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यानुसार बाधित व्यक्तीला दहा दिवसांत कोणताही त्रास होत नसेल, त्याची प्रकृती चांगली असेल तर त्याला डिस्चार्ज देण्यात येऊन घरीच 14 दिवस क्वारंटाईन करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार या रुग्णाला शुक्रवारीच डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य यंत्रणेत विसंवाद ?
जिल्हा आरोग्य विभाग आणि प्रशासनात यापूर्वी अनेकदा विसंवाद असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी त्यात कहरच झाला. शुक्रवारी पाथर्डीच्या करोना बाधित रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभागाने प्रशासनाला दिली नाही. ही माहिती शनिवारी प्रशासनाला दिल्यानंतर जिल्ह्यात 41 करोनामुक्त झाल्याचे समोर आले. आरोग्य यंत्रणेतील विसंवादाचा भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता अधिकार्‍यांमधून व्यक्त होत आहे.

18 बाधितांवर उपचार
जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत 1 हजार 832 व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी 1 हजार 730 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुक्त झालेल्या 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 18 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या