Thursday, April 25, 2024
Homeनगरनगर पंचायत समितीवर तिसर्‍यांदा फडकला भगवा

नगर पंचायत समितीवर तिसर्‍यांदा फडकला भगवा

सभापतिपदी कांताबाई कोकाटे, उपसभापतिपदी रवींद्र भापकर बिनविरोध

अहमदनगर (वार्ताहर)- सभापती-उपसभापती निवडीध्ये नगर पंचायत समितीवर तिसर्‍यांदा भगवा फडकला आहे. सभाापतिपदी शिवसेनेच्या विद्यमान उपसभापती कांताबाई कोकाटे तर उपसभापतिपदी काँग्रेसचे रवींद्र भापकर यांच्या बिनविरोध निवडी झाल्या.
नगर तालुका पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाची निवडणूक मंगळवारी (दि. 7) झाली. महाविकास आघाडीच्या वतीने सभापती पदासाठी शिवसेनेच्या उपसभापती कांताबाई कोकाटे यांनी तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे रवींद्र भापकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

- Advertisement -

भाजपकडून सभापती पदासाठी स्वाती कार्ले तर उपसभापती पदासाठी बेबी पानसरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तीन वाजेनंतर अर्जांची छाननी झाली. त्यानंतर भाजपच्या दोन्ही उेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी जाहीर केले. दोन्ही पदाच्या निवडी बिनविरोध झाल्यानंतर शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

नगर तालुका पंचायत सामतीत सेनेचे सात, काँग्रेसचे एक तर भाजपाचे चार सदस्य आहेत. भाजपला पंचायत समितीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, गोविंद मोकाटे यशस्वी झाले.

निवडीच्यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या सुरेखा गुंड यांनी सदस्यांना व्हिप बजावला होता. माग भाजपने माघार घेतल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी काम पाहिले. सभेसाठी महाआघाडीचे रामदास भोर, दिलीप पवार, गुलाब शिंदे, विठ्ठल काळे, सुरेखा गुंड, मंगल आव्हाड, तर भाजपचे रवींद्र कडूस, स्वाती कार्ले, सुनीता भिंगारदिवे, बेबी पानसरे आदी उपस्थित होते.

शेवटपर्यंत धाकधूक…
गत पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागली होती. मागील निवडीत सदस्यांध्ये फाटाफूट झाली होती. पुन्हा तोच कित्ता गिरवला जाऊ नये म्हणून सदस्यांना निवडीपूर्वीच सुरक्षितस्थळी पाठवण्यात आले होते. सेनेकडून सभापती पदासाठी उपसभापती कांताबाई कोकाटे व सुरेखा गुंड यांनी दावा सांगितला होता. तर उपसभापती पदासाठी भापकर व डॉ. दिलीप पवार या दोघांकडून दावा केला जात होता. अखेर सभापती पदासाठी कोकाटे व उपसभापति पदासाठी भापकर यांच्या नावावर एकत झाले. त्यानंतर कोकाटे व भापकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपचे गटनेते रवींद्र कडूस व दीपक कार्ले शेवटच्या क्षणापर्यंत सेनेचे सदस्य फोडण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या