तिथीनुसारही जयजयकार
Featured

तिथीनुसारही जयजयकार

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार साजरी केली जाणारी जयंतीही विविध पक्ष, संघटनांनी चौकाचौकांत मोठ्या जल्लोषात साजरी केली. पोवाडे, स्फूर्ती गितांद्वारे सकाळपासूनच शिवरायांचा जयजयकार कानी पडत होता. काही संघटनांनी एकत्रितपणे दुचाकी रॅलीही काढली.

अनेक पक्ष, संघटना शिवजयंती तिथीनुसार साजरी करतात. शहरातील माळीवाडा, स्टेशन रोड, सर्जेपुरा, दिल्लीगेट, केडगाव, सावेडी भागातील चौकाचौकांत शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आदी पक्षांबरोबरच विविध संघटनांनीही जुन्या एसटी स्टँडजवळील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी परिसर जयघोषांनी निनादून गेला होता.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, श्री शिव प्रतिष्ठान, तेली समाज महासभा व मंदिर बचाव समितीच्या वतीने पारिजात चौक ते जुन्या बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Deshdoot
www.deshdoot.com