Thursday, April 25, 2024
Homeनगरनगरमध्ये लपूनछपून प्लास्टिक विक्री सुरूच

नगरमध्ये लपूनछपून प्लास्टिक विक्री सुरूच

महापालिकेने धडक कारवाईची करण्याची आवश्यकता

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच जनावरे व मनुष्यांसाठी देखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु असे असताना देखील सिंगल युज प्लास्टिकचा शहरात अनेक ठिकाणी लपून-छपून वापर सुरू आहे. यामुळे प्लास्टीक बंदीचा फज्जा उडाला असल्याचे चित्र आहे. यामुळे महापालिकेने प्लास्टिक विरोधात धडक कारवाईची मागणी होत आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने गेल्या वर्षी प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली होती. शहरासह एमआयडीसी परिसरात अनेक छापेमारी झाली. त्यानंतर प्लास्टिकचा वापर कमी होईल, ही अपेक्षा होती. मात्र, शहरात अद्यापही प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरूच आहे. सिंगल युज प्लास्टिकच्या विरोधात सुरू असलेली मोहीम प्रभावी ठरली नसल्याने प्लास्टिकचा सर्रास वापर होताना दिसत आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने या पर्यावरणाला मोठा धोका असल्याने हा सर्वासाठी चिंतेचा विषय ठरला आहे, असे असतानाही प्लास्टिकचा वापर बेसुमार वाढला आहे. प्लास्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण थांबविणे आणि वाया जाणार्‍या प्लास्टिकचे व्यवस्थापन करणे ही मोठी समस्या ठरली आहे.

दरवर्षी लाखो टन प्लास्टिकची निर्मिती होते. मात्र, त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी जगभरात कडक धोरण ठरविण्यात आलेले आहेत. एकदा वापरल्यावर दुसर्‍यांदा वापरात न येणारे अर्थात कचर्‍याच्या डब्यात जाणार्‍या प्लास्टिकला सिंगल यूज प्लास्टिक म्हणतात. यालाच डिस्पोजेबल प्लास्टिकही म्हणतात. या प्लास्टिकचा पुनर्वापर करता येतो. याचा वापर बर्‍याचदा दैनंदिन कामात होतानाही दिसतो. प्लास्टिकच्या कचर्‍याचे ढीगही वाढत आहेत. प्लास्टिकमध्ये असणार्‍या घातक रसायनामुळे माणसाच्या शरिरात कॅन्सर (कर्करोग) निर्माण होतो.

प्लास्टिकमध्ये एन्डोक्राईनशी संबंधित समस्या निर्माण करणारे रसायनही असते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखे आजार जडतात. प्लास्टिक जाळल्यावर कार्बन मोनोऑक्साईड, डायऑक्सिन, हायड्रोजन सायनाईड यासारखे विषारी वायू वातारवणात पसरतात. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे महापालिकेने मध्यतंरी प्लास्टिकच्या विरोधात मोहीम सुरू करून विक्रेत्यांवर कारवाई केली. तरी देखील शहरात अनेक ठिकाणी प्लास्टिक विक्री सुरूच आहे.

महापालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई बंद नाही. दर तीन ते चार दिवसांनी महापालिका प्लास्टिक विक्री विरोधात मोहीम राबवित आहे. तीन-चार दिवसांपूर्वी महापालिकेने कारवाई करत 20 हजार रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. पुढे देखील अशी कारवाई सुरूच राहणार आहे.
– राहुल द्विवेदी, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या