61च्या मुळावर पडणार घाव…
Featured

61च्या मुळावर पडणार घाव…

Sarvmat Digital

29 वाचविता येणे शक्य । हरियालीचा प्रस्ताव

अहमदनगर (प्रतिनिधी) – भिस्तबाग रोडच्या नुतणीकरणास अडथळा ठरणार्‍या 61 झाडांच्या मुळावर लवकरच घाव पडणार आहे. मात्र यातील 29 झाडे वाचविता येणे शक्य असल्याचा प्रस्ताव हरियाली संस्थेने महापालिकेला दिला आहे. त्यावर आता काय निर्णय होतो याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबाग महल रस्त्याच्या रुंदीकरण व नुतणीकरणाचे काम महापालिकेने सुरू केले आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी त्यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्याकडेला 111 झाडे असून 61 झाडे रुंदीकरणात अडथळा निर्माण करत आहेत. ही झाडे महापालिकेकडून काढली जाणार आहेत.

मात्र यातील बरेच 29 झाडे थोडीफार तडजोड करुन वाचविता येणे शक्य असल्याचा प्रस्ताव हरियाली संस्थेने दिला आहे. 29 झाडे फुटपाथ व रस्त्यावर 1 ते 2 फुट आत घेवून तडजोड करुन वाचविता येणे शक्य असल्याचा हा प्रस्ताव असल्याचे सुरेश खामकर यांनी सांगितले.

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करुन संवर्धन करण्यासाठी फुटपाथ रस्त्याच्या दोन्ही बाजुने 20 फुट अंतरावर खड्ड्यासाठी जागा सोडावी. आराखड्यात तशी जागा निश्चित करुन राखीव ठेवण्याची मागणीही खामकर यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com