Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेर शहरातील जनतेला ना. थोरातांचे आवाहन

संगमनेर शहरातील जनतेला ना. थोरातांचे आवाहन

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर मध्ये कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले आहे, ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. कोरोनाचा विषाणू हा संपर्कातून पसरतो आहे. या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडायची असेल तर आपल्याला 100 टक्के लॉकडाऊन करावे लागणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी माझ्याशी सविस्तर चर्चा केली. पुढील तीन दिवस संगमनेरमध्ये 100 टक्के लॉकडाऊन असणार आहे, या काळात स्थानिक नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

आपण प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन मी करत आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा संदर्भाने प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतलेली आहे. त्यामुळे त्याबाबतीत जनतेने गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. या परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर व प्रशासनाला आवश्यक त्या सेवासुविधा व साधने शासनस्तरावरून उपलब्ध करून दिले जातील.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची साखळी तोडायची असेल तर लॉक डाऊन शंभर टक्के यशस्वी करणे हाच एक मात्र रामबाण उपाय आहे. त्यामुळे लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी आपण प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करा हे हे आवाहन मी करतो आहे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या