Thursday, April 25, 2024
Homeनगरराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा

हर्ष तनपुरे यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा होणार?

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- राज्याचे नवनियुक्त उर्जा व नगरविकास, आदिवासी तथा उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

तत्कालीन भाजपा शासनाने नगराध्यक्षपदाचा उमेद्वार हा थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीन वर्षापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. त्यांच्याविरूद्ध भाजपा व काँग्रेससह विरोधी सर्वपक्षीय विखे व कर्डिले गटाचे रावसाहेब चाचा तनपुरे यांनी लढत दिली होती. गेल्या तीन वर्षात त्यांनी नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावली.

त्यानंतर त्यांनी राहुरी विधानसभेतील नगर व पाथर्डी तालुक्यातही आपला संपर्क वाढवून विविध प्रश्नांवर संघर्ष केला होता. ग्रामीण रूग्णालयाच्या बाबतीतही त्यांनी उपोषण केले होते. तालुक्याच्या पाणी प्रश्नावर, गावोगावच्या पिण्याच्या पाणी योजनेबाबत तसेच प्रसाद कारखान्याच्या माध्यमातून सहकार्य करतानाच त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आंदोलन करून वाचा फोडली.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल पाचवेळा आमदार असलेलेे भाजपा नेते शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला. राज्यातील अनेक राजकीय घडामोडीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत सरकारमध्ये त्यांना ज्येष्ठनेते शरद पवार यांनी संधी देत सहा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविली.

मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना नगराध्यक्षपदासाठी पुरेसा वेळ राहुरी शहरातील प्रश्नांना वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील विकासाची गती कमी होऊ नये, म्हणून राजीनामा देत असल्याचे त्यांनी ना.तनपुरे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे राजीनामा सूपूर्द केला असून तात्पुरता कार्यभार उपनगराध्यक्षा राधा साळवे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरासाठी जे काही करता येईल, त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. यापुढेही नवीन अध्यक्षांना राज्य शासनामार्फत शहरासाठी ज्या योजना प्रस्तावित असतील, त्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा नगरपरिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून झाल्याने शहरवासियांचे तसेच नगर परिषदेत काम करताना सर्वच सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी मोलाची साथ दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

तर मैदानात
नुतन नगराध्यक्ष पदाबाबत शासनाच्या आदेशानुसार जुन्या नियमातून सर्व जनतेतून निवडणूक झाल्यास युवानेते हर्ष तनपुरे यांना सत्ताधारी गटाकडून उतरविले जाऊ शकते. नगरसेवकांतून निवड करायची झाल्यास सत्ताधारी गटाकडून नक्की कोणाची वर्णी लागणार? की हर्ष तनपुरेंसाठी एखादा विद्यमान नगरसेवक राजीनामा देऊन पद रिकामे करून त्यांनाच संधी मिळू शकते? याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या