Thursday, April 25, 2024
Homeनगरमुठेवाडगावात बिबट्या तरुणांनी पिटाळला

मुठेवाडगावात बिबट्या तरुणांनी पिटाळला

माळवाडगाव (वार्ताहर)- आपण अडगळीच्या झाडीच्या रस्त्याने भले चार चाकी वाहनातून जात आहात अन् दिवसाढवळ्या समोर अचानक बिबट्या आला तर काय अवस्था होईल…मुठेवाडगावच्या तरुणांनी साक्षात या प्रसंगाला मोठ्या धैर्याने तोंड देत त्यास पिटाळले. एवढेच नव्हेतर त्यांनी पाच मिनिटे समोर आलेल्या बिबट्यास पिटाळून लावत फेसबुकवर लाईव्ह चित्रण दाखविल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव, टाकळीभानसह पूर्व परिसरात सर्वत्र बिबट्याचा वावर सुरू असताना मुठेवाडगाव (चारवाडी)शेती महामंडळ शिवारात रात्रंदिवस खुलेआम भटकंती करणार्‍या बिबट्याला पकडण्यासाठी बकरीसह पिंजरा लावूनही तो पिंजर्‍याकडे फिरकत नाही.

- Advertisement -

काल रविवारी ज्ञानदेव मल्हारी मुठे हे आपल्या मालकीच्या बंदीस्त दरवाजाच्या जीपमधून राहाता येथून वीजपंप घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास दत्तात्रय बडाख, दादासाहेब मुठे यांच्यासमवेत मुठेवाडगाव (चारवाडी ) शिवारातील शेतात चालले असताना अचानक समोर बिबट्या आल्याने न घाबरता हिंमतीने पाच मिनिटे त्यास पिंजर्‍याकडे पिटाळले.

चार दिवसांपूर्वी प्रकाश मुठे व तात्यासाहेब चौधरी या तरुणांनाही मालवाहू अ‍ॅपे रिक्षातून वीज पंप सुरू करण्यासाठी जाताना बिबट्या आढळला. त्यांनीही मोठ्या हिमतीने स्वत:ची सुटका करून घेतली. या परिसरात बिबट्याला मनसोक्त हरणांची शिकार मिळत असल्याने पिंजर्‍यात ठेवलेल्या बकरीकडे तो फिरकत नाही. उलट त्याचा दिवसा ढवळ्या दिमाखात संचार सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या