Friday, April 26, 2024
Homeनगरमुळा धरणग्रस्त व विद्यापीठ प्रकल्पग्रस्त प्रश्नी सकारात्मक भूमिका घेऊ

मुळा धरणग्रस्त व विद्यापीठ प्रकल्पग्रस्त प्रश्नी सकारात्मक भूमिका घेऊ

वावरथ-जांभळी पूल मार्गी लावू; ना. तनपुरेंची राहुरीत लाभार्थ्यांना ग्वाही

राहुरी (प्रतिनिधी)– मुळा धरणग्रस्त आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे लाभार्थ्यांनी केली. तर वावरथ जांभळी येथे मुळा धरणावर पूल बांधण्याची मागणीही करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांसाठी बैठक बोलाविण्यात येणार असून ना. तनपुरे यांनी कृषीमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली. तसेच मुळा धरणग्रस्तांच्या प्रश्नावर रिक्त जागा आणि एकूण शिल्लक प्रकल्पग्रस्त यांचा आढावा घेऊन हा प्रश्नही मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर वावरथ जांभळीच्या पुलाच्या खर्चाचे मोजमाप करून आढावा तयार करण्याचे आदेश ना. तनपुरे यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांना दिले.

राहुरी येथील नगरपालिका सभागृहात ना.प्राजक्त तनपुरे यांनी मुळा धरणग्रस्त यांची भेट घेऊन सविस्तर विषय समजून घेतला. मुळा धरणग्रस्त अध्यक्ष मारूती बाचकर यांनी माहिती दिली. यावेळी जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी नान्नोर, अण्णासाहेब आंधळे उपस्थित होते. रिक्त जागा आणि एकूण शिल्लक प्रकलपग्रस्त यांची माहिती घेऊन वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.
विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर विजयराव तमनर व ज्ञानेश्वर बाचकर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष आग्रह धरला. त्याचबरोबर मुळाधरणामुळे वावरथ जांभळी या गावांचा तालुक्याशी तुटलेला संपर्क पुन्हा सुरळीत व्हावा, यासाठी पुलाची मागणी नेहमी होते.

या विषयावर विजयराव तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, अण्णासाहेब सोडनर, पाटीलनाना बाचकर, चंद्रकांत कदम यांनी लक्ष वेधले असता त्या ठिकाणचे मोजमाप करून आराखडा तयार करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

यावेळी ठकाजी बाचकर, आप्पासाहेब तमनर, सरपंच श्रीकांत बाचकर, मंजाबापू बाचकर, कैलास बाचकर, संतोष बोरुडे, सतीश बाचकर, कोंडीराम बाचकर, गुजीनाथ सोडनर, समाजी बेद्रे, अनिल डोईफोडे, नवनाथ रोकडे, गोरक्षनाथ आघाव, संपत देवकर, दत्तू डहाळे, सोपान वडितके, लक्ष्मण बाचकर आदींसह मुळाधरणग्रस्त उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या