Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेर, आलमगीरचा आज निर्णय

संगमनेर, आलमगीरचा आज निर्णय

…तर मुकुंदनगरला काही प्रमाणात दिलासा
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात हॉट स्पॉट ठरलेल्या नगर शहरातील मुकुंदनगर, तालुक्यातील आलमगीर, संगमनेर शहारातील काही भाग आणि नेवासा शहरपैकी मुकुंदनगरमध्ये आजअखेर एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्यास त्याठिकाणी काही प्रमाणात नागरिकांना दिलासा देण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. यासह संगमनेर आणि आमलगीरबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, नेवासा आणि जामखेडच्या हॉटस्पॉटमध्ये प्रशासनाने आधीच वाढ केल्याने आता विषय केवळ मुकुंदनगर, संगमनेर आणि आमलगीरचा राहणार आहे. नगर शहरातील मुकुंदनगर भागा संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज (गुरुवारी) या ठिकाणी एकही कोरोना बाधीत न आल्यास हॉट स्पॉटमधून काही प्रमाणात दिलासा देण्याचा विचार असल्याचे सांगितले. यामुळे याठिकाणी दुपारी तीनपर्यंत किराणा दुकाने व दिवसभर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र, हे सर्व त्या ठिकाणच्या परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, संगमनेर आणि आलमगीर येथील हॉट स्पॉटची मुदत आज (गुरुवारी) रात्री 12 वाजता संपणार आहे. संगमनेरमधील कोरोना पॉझिटिव्ह आता निगेटिव्ह झालेले आहेत. यामुळे त्याठिकाणी नगरच्या मुकुंदनगरप्रमाणे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आलमगीरच्या तीन कोरोनाबाधीतांवर उपचार सुरू असून हे सर्व निगेटिव्ह झाल्यावर या भागात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या