के के रेंजचा मुद्दा लोकसभेत

के के रेंजचा मुद्दा लोकसभेत

खा. सुजय विखेंनी केली स्पष्टीकरणाची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरजवळील के.केे रेंजच्या विस्तारीकरणासाठी एक लाख एकर जमीन अधिग्रहणासंबंधी संरक्षण मंत्रालयाने काही निर्णय घेतला आहे काय? यासंबंधी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी खा. डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेत आज केली.

नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यातील 23 गावांतील 25 हजार 619 हेक्टर जमिन के.के.रेंजच्या विस्तारीकरणावेळी अधिग्रहीत केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने मुल्यांकनही काढले आहे. स्थानिक वृत्तपत्रातून या सदंर्भात माहिती मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. संरक्षण मंत्रालय अथवा केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय? याची माहिती मिळावी, अशी मागणी खा. विखे यांनी आज संसदेत केली.

1980 पासून ती तालुक्यातील 23 गावांतील जमिन रेड झोन म्हणून गणली जाते. 2021 मध्ये रेड झोनची अधिसूचना संपली आहे. आता रेंज 2 प्रस्ताव असून त्यासाठी ही जमिनच अधिग्रहण केली जाणार असल्याचे शेतकर्‍यांना मिडियाच्या माध्यमातून समजले. याबाबत नेमका प्रस्ताव काय आहे, अशी विचारणा खा. विखे यांनी संसदेत केली.

Last updated

Deshdoot
www.deshdoot.com