मटकी झाकली अन् डसलं माकड
Featured

मटकी झाकली अन् डसलं माकड

Sarvmat Digital

दिल्लीगेट परिसरात धुमाकूळ

अहमदनगर (प्रतिनिधी) – गत दीड महिन्यापासून शहरात हिंडणार्‍या माकडाने काल दिल्लीगेट परिसरात हैदोस घातला. एका भाजी विक्रेत्याने मटकी झाकल्याने त्याने चावा घेतला. मर्कट लिलांनी नगरकर हैराण असून त्याला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.

आज सकाळी या माकडाने दिल्लीगेट जवळ शमी गणपती मंदिरासमोर मटकी विकणार्‍या अशोक मुत्याल यांना चावा घेऊन जखमी केले. त्यांना खांद्यावर किरकोळ जखम झाली आहे. हे माकड भाजी तसेच मटकी खात होते.

मुत्याल यांनी मटकीवर झाकण टाकल्याने माकडाने त्यांच्यावर हल्ला केला. गेल्या एक दीड महिन्यातील त्याचा हा पहिलाच हल्ला आहे. त्याने हल्ला केल्यावर परिसरातील नागरिकांनी वन्य जीव संरक्षक व निसर्गमित्र मंदार साबळे यांना या बाबत माहिती दिली. साबळे त्या ठिकाणी जाईपर्यंत ते त्या भागातून निघून गेले होते.

साबळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी एन बी पोकळे व वनपाल देविदास पतारे यांना माहिती देऊन त्याला पकडण्यासाठी तातडीने काय उपाययोजना करता येतील या विषयी चर्चा केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com